Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गणेश वानकर यांचे शक्तिप्रदर्शन ; जयकुमार गोरे, दिलीप माने अन् विजयकुमार देशमुखांची उपस्थिती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 January 2026
in political
0
गणेश वानकर यांचे शक्तिप्रदर्शन  ; जयकुमार गोरे, दिलीप माने अन् विजयकुमार देशमुखांची उपस्थिती
0
SHARES
250
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गणेश वानकर यांचे शक्तिप्रदर्शन ; जयकुमार गोरे, दिलीप माने अन् विजयकुमार देशमुखांची उपस्थिती

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत. सोलापूर महानगरपालिकेतसुद्धा भाजपाची सत्ता येणार असून प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी हजारोंच्या साक्षीने वानकर परिवाराला दिला. देगावमध्ये झालेल्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी होती. लाडक्या बहिणींच्या गर्दीने सभामंडप ओसंडून वाहत होता.

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ६ मधील भाजपच्या उमेदवार सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांच्या निवडणुक प्रचाराचा सोलापुरातील पहिला शुभारंभ रविवारी सकाळी देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यानंतर झालेल्या विराट सभेत पालकमंत्री गोरे यांनी प्रभागातील नागरिकांना आश्वासित केले. प्रभागाच्या विकासाची काळजी आपली असून आपण सर्व उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी कामाला लागा,असे आवाहनही पालकमंत्री गोरे यांनी यावेळी बोलताना केले.

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनिष देशमुख, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर,प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे उपस्थित होते.पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सभेच्या ठिकाणी आगमन होताच जय श्रीराम,वंदे मातरम ,च्या घोषणांनाही परिसर दणाणून गेला.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, वानकर परिवाराने सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची पताका मोठ्या ताकतीने फडकविण्याचे काम निष्ठेने पार पाडले . त्यानंतर वानकर परिवार भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आला आहे महाराष्ट्र आणि देशाचा विकास फक्त भाजपच करू शकतो, या विचाराने वानकर परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वानकर परिवाराला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला आहे . त्यामुळे वानकर परिवाराला भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे स्वीकारले आहे. सभामंडपातील गर्दी पाहिल्यानंतर प्रभाग क्रमांक ६ मधील चारही उमेदवार निवडून येणार आहेत, हे आता ज्योतिषाला सुद्धा विचारण्याची गरज नाही.

पूर्वी प्रभाग ६ मधून वानकर निवडून येईल,असे लोक म्हणायचे. आता मात्र भाजप निवडून येईल असे लोक म्हणू लागले आहेत .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून सोलापूरसाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास करण्यात आला . विमानसेवा, आयटी पार्क झाले . दररोजच्या पाणीपुरवठ्याचा सुद्धा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे आता वानकर परिवार भाजपमध्ये आल्यामुळे प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकासगंगा आणण्याचा शब्द आपण सर्वांच्या साक्षीने देत आहोत. कोणत्याही परिस्थितीत सोलापूर शहरामध्ये सर्वाधिक मताधिक्याने प्रभाग क्रमांक ६ मधील सर्व उमेदवार निवडून येतील ,असा विश्वास
व्यक्त प्रभाग क्रमांक ६ मध्ये आज खऱ्या अर्थाने आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे .

प्रभाग क्रमांक सहाचा हा प्रचार नव्हे तर विजयी सभा असल्याचेच पालकमंत्री गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर ,भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनीष देशमुख तसेच प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे यांनीही यावेळी आपले विचार मांडले .

वानकर परिवारामुळे प्रभाग क्रमांक सहा मधील भारतीय जनता पक्षाला आणखी मोठे बळ आले असून सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांनी मनोगत व्यक्त करताना शत ; प्रतिशत भाजपचा नारा दिला. उमेदवार सुनील खटके आणि मृण्मयी गवळी यांनी प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

याप्रसंगी भरत सुर्वे, सिद्धेश्वर कस्तुरे,माजी नगरसेविका मंगलताई वानकर ,सोमराज गायकवाड ,दत्तात्रय वानकर,विठ्ठल वानकर ,महादेव गवळी , किरण वाघमोडे ,लखन कारंडे ,यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

विरोधात राहून काम
करता येत नाही ,म्हणून

सोलापूर महानगरपालिका निवडणूक असो किंवा अन्य कोणत्याही निवडणुका असो गणेश वानकर आणि परिवाराने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे . गणेश वानकरांनी भाजपात येण्यासाठी यापूर्वीच विनंती करण्यात आली होती ,मात्र त्यांनी त्यावेळी प्रतिसाद दिला नाही.मात्र आज ते भाजपामध्ये आले आहेत . त्यांचे निश्चितच स्वागत आहे. विरोधात राहून विकास कामे करता येत नाहीत याची त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांनी सत्तेबरोबर म्हणजेच भाजपबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे . दोघा आमदारांचा हा भाग असला तरी दमान नगर आणि परिसरात १०० टक्के विकासाची कामे झालेली आहेत . प्रभागाचा विकास हेच आता अंतिम ध्येय असल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तिसरी पिढी राजकारणात
सोलापूरच्या राजकारणात अनेक वर्षे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर ,पत्नी व माजी नगरसेविका मंगलताई वानकर ,गणेश वानकर ,दत्तात्रय वानकर आणि विठ्ठल वानकर हे निष्ठेने काम करतच आहेत . परंतु आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील समर्थ ,विश्वजीत आणि अभय वानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सोबत जनसेवेसाठी कामाला सुरुवात केली. तिसऱ्या पिढीच्या या युवा नेत्यांचे सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

यापुढे सर्व निवडणुका कमळ चिन्हावरच लढविणार

विरोधी पक्षात असताना सुद्धा विकासकामात कोणतीच कसर सोडली नाही. प्रभागाचा कमालीचा कायापालट करण्यात आपण यशस्वी झालो . आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून विकासाची मोठी कामे झाली आहेत . माजी आमदार दिलीप माने यांनी सुद्धा निधी दिला . प्रभागाचा मोठा विकास करताना वाड्या वस्त्यांवरचा भाग असल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत . याच भागातून आदिला नदी वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो . ओढ्यावर पूल नाही . त्यामुळे पालकमंत्र्यांनी या प्रभाकडे जातीने लक्ष घातल्यास विकासाला आणखी बळ मिळेल ,असे सांगतानाच वानकर परिवाराचा भाजपमधील प्रवेशाचा निर्णय जनतेला आवडला आहे . ठाकरे परिवारासाठी जसे एकनिष्ठ राहिलो तसेच भाजपासुद्धा यापुढे सर्व निवडणुका कमळ चिन्हावरच लढविणार आहोत . ना जातीचा ,ना पातीचा ,आमचा विजय आमच्या एकजुटीचा ,अशी घोषणा करत पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

Tags: BJPGanesh wankarJaykumar gore
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसच्या दोन्ही हातात शरद पवारांची तुतारी ; बाबा दादांचा सपोर्ट, प्रभाग वीसचे गणित असे जुळले!

Next Post

विकास कामांच्या जोरावर तस्लिम शेख पुन्हा मैदानात ; प्रभाग 20 मध्ये अपक्ष आव्हान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
विकास कामांच्या जोरावर तस्लिम शेख पुन्हा मैदानात ; प्रभाग 20 मध्ये अपक्ष आव्हान

विकास कामांच्या जोरावर तस्लिम शेख पुन्हा मैदानात ; प्रभाग 20 मध्ये अपक्ष आव्हान

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998185
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group