Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

हम भी किसी से कम नहीं ! सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीकडे तब्बल इतके इच्छुकांचे अर्ज

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 December 2025
in political
0
हम भी किसी से कम नहीं ! सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीकडे तब्बल इतके इच्छुकांचे अर्ज
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हम भी किसी से कम नहीं ! सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीकडे तब्बल इतके इच्छुकांचे अर्ज

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापूर शहरात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गुरुवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १७५ इतक्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तीन दिवसात तब्बल रेकॉर्डब्रेक अशा तब्बल ४१२ जणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्यामुळे सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दबदबा असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राष्ट्रवादी पक्षाची सोलापुरातील ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस, एमआयएम पक्षामधील माजी उपमहापौर तसेच माजी गटनेते माजी नगरसेवकांनी आपापल्या पक्षाला धक्का देत अजित पवारांच्या पक्षाकडून महानगरपालिकेसाठी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री माजी स्थायी समिती सभापती इब्राहिम कुरेशी, माजी नगरसेवक रियाज खैरदी, माजी परिवहन सभापथी राजन जाधव, माजी नगरसेविका लता फुटाणे, माजी नगरसेवक विवेक खरटमल, माजी नगरसेवक मृणाल पाटील माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी नगरसेवक वाहेदाबी शेख, माजी नगरसेवक वाहिद नदाफ, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम तसेच राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचे बंधू हरीष बागवान यांच्यासह शेकडो इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादीकडून वाजत गाजत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले.

धनंजय मुंडे समर्थक पैलवान सनी देवकते हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून प्रभाग क्रमांक ७ मधून उमदेवारी अर्ज सादर करण्यासाठी ट्रॅक्टर चालवत धनगरी पोशाखात राष्ट्रवादी कार्यालयात आले.त्याचे सर्वांनी लक्ष वेधून घेतले.

सोलापूर महानगरपालिकेसाठी गेल्या तीन दिवसांपासून जुनी मिल कंपाउंड येथील राष्ट्रवादी भवनात पक्षाचे शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल,मकबूल मोहोळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, प्रा. श्रीनिवास कोंडी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे आनंद मुस्तारे, सोशल मीडिया प्रमुख वैभव गंगणे आदींनी इच्छुकांचे अर्ज स्वीकारले.

इच्छुकांचा दमदार प्रतिसाद

सोलापुरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ४१२ अर्ज आल्यामुळे निश्चितच विश्वास दुनावला आहे.अजितदादा पवार यांचे विकासाचे धोरण आणि व्हिजन तसेच सर्व समाजघटकाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न यामुळे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने ” अब की बार ७५ पार ” शक्य होईल.निष्ठावंत कार्यकर्त्यांना आता खऱ्या अर्थाने न्याय देता येईल.
संतोष पवार – शहर- जिल्हाध्यक्ष – अजितदादा पवार राष्ट्रवादी, सोलापूर

Tags: SMC Ajit Pawar NCP
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात भाजप समोर शिवसेनेचे 50 जागेची डिमांड ; एनसीपी नो इन्व्हिटेशन, भाजप शिवसेनेच्या बैठकीत काय घडले

Next Post

जुळे सोलापुरातील त्या खून प्रकरणात आरोपीला उच्च न्यायालयात जामीन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जुळे सोलापुरातील त्या खून प्रकरणात आरोपीला उच्च न्यायालयात जामीन

जुळे सोलापुरातील त्या खून प्रकरणात आरोपीला उच्च न्यायालयात जामीन

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002497
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group