रामेश्वर नाईक यांनी आधार हॉस्पिटलचे केले कौतुक ; राठोड बंधूंच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी डॉ. योगेश राठोड यांच्या आधार क्रिटिकल केअर हॉस्पीटलला सदिच्छा भेट दिली. राठोड परिवाराने त्यांचे स्वागत केले.
शिवसेना शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, सोनाई फाउंडेशन चे युवराज राठोड, भाजपचे माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड, राष्ट्रीय गोर बंजारा परिषदेचे युवक अध्यक्ष श्रीमंत चव्हाण, अशोक चव्हाण, युवराज चव्हाण, राजमोती राठोड, डॉ. माधव जोशी, अमोल दळवी, अमोल गायकवाड, दिनेश राठोड, धनराज कटकम, चंद्रकांत राठोड यांची उपस्थिती होती.
रामेश्वर नाईक यांनी हॉस्पिटलची सविस्तर माहिती घेतली. आधार हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच मेडीक्लेम योजना राबविल्या जातात त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना एक मोठा आधार असल्याचे कौतुक केले.