जया भाऊंच्या दौऱ्यात शहाजी भाऊंना स्पेशल ट्रीटमेंट
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. या भरगच्च दौऱ्यामध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले असून महायुतीतील नेत्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात गाठीभेटी आहेत.
काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप माने यांच्याही निवासस्थानी ते भेट देणार आहेत.
तत्पूर्वी गुरुवारी सकाळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीला आमदार देवेंद्र कोठे पूर्णवेळ उपस्थित होते. मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे काही वेळ येऊन भेटून गेले नंतर आमदार सुभाष देशमुख यांनीही अर्धा तास भेटून बाहेर पडले.
बापू गेल्यानंतर शहाजी पवार हे शासकीय विश्रामगृहात आले. थोडा वेळ थांबून पालकमंत्री जयकुमार गोरे हे पक्षाच्या मेळाव्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या गाडीमध्ये आमदार देवेंद्र कोठे, प्रदेश नेते संतोष पाटील आणि पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असे तिघे मागे बसले होते. याचवेळी पालकमंत्र्यांनी गाडीमध्ये पाहिले असता त्यांना शहाजी पवार दिसले नाहीत.
शहाजी पवार हे आपल्या गाडीत बसत होते तेवढ्यात देवेंद्र कोठे यांना सांगून त्यांनी शहाजी पवार यांना बोलवून घेतले. गाडीत बसलेले त्यांचे स्वीय सहाय्यक यांना दुसऱ्या गाडीत बसायला सांगून त्यांनी शहाजी भाऊ यांना आपल्या गाडीत बसवून ते कार्यक्रमाकडे रवाना झाले.