Wednesday, July 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

समरसेनजीत प्रमोद गायकवाड व अजित गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 March 2025
in crime
0
समरसेनजीत प्रमोद गायकवाड व अजित गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समरसेनजीत प्रमोद गायकवाड व अजित गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला

सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पिडीत महिला, रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत उर्फ लकी गायकवाड, हर्षजीत गायकवाड, संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

 

त्यापैकी सरसेनजीत प्रमोद गायकवाड याने नियमित जामिनासाठी व अजित गायकवाड याने अटकपूर्व जामिनासाठी सोलापूर येथील सत्र न्यायालयात दाखल केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी फेटाळून लावला.

 

यात हकिकत अशी कि, दि.१/१/२५ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिध्दार्थ हौसिंग सोसायटीतील रिंकि शिवशरण, अदित्य दावणे, पुथ्वीराज शिरसे व रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहारजवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबलेले होते. त्यावेळी सनी निकंबे हा दारु पिऊन पिडीत महिलेच्या अंगावर आला, प्रमोद गायकवाड पट्टा काढून अदित्य दावणे यास मारहाण करू लागला. त्यावेळी ऋतूज गायकवाड व रिकी शिवशरण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड याने प्रसेनजीत उर्फ लकी, हर्षजीत उर्फ विकी व संजय उर्फ सोन्या या तिघांना आवाज देऊन “गाडीतील रॉड काढून घेऊन या, या लोकांना माज आलेला आहे, कुठले भिकारडे येथे आलेले आहेत”, असे ओरडून शिविगाळी करून त्यांना बोलावून घेतले.

 

सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पिडीत महिला, रितेश गायकवाड, सुमित गायकवाड यांना मारहाण केली, त्यावेळी कोण जर यांच्या मदतीला आले तर त्यांना देखील आम्ही सोडणार नाही असे ओरडल्याने कोणी मदतीला आले नाही. परंतु निलेश शिरसे व सागर शिरसे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही सर्व आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली. त्यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असता समरसेनजीत उर्फ टिपू गायकवाड याने त्याला अडवून पाडले व रस्त्यावरून फारशी उचलून वैभव वाघे च्या डोक्यात घातली. त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड सह सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व लाकडी दंडुकाचे सहाय्याने त्याचे सर्वांगावर मारहाण केली. प्रमोद गायकवाड याने लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड, व डोक्यात मारले, प्रसेनजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांनी लोखंडी रोडने त्याचे हातापायावर, डोक्यावर, पाठीवर, व शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली. अजित गायकवाड व किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने मारहाण केली. प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे यास सोडविण्यास कोणीही पुढे आले नाही.

वैभव वाघे हा मोठमोठ्याने रडत होता परंतु सर्व आरोपी त्यास अमानुषपणे मारहाण करीत राहिले. तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले. वैभव वाघे यास सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केल्यानंतर दि. ०६/०१/२०२५ रोजी तो मरण पावला.
यातील अटकेतील आरोपी समरसेनजीत प्रमोद गायकवाड यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता व अजित ईश्वर गायकवाड याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मे.अतिरिक्त सञ न्यायाधीश एस.व्ही.केंद्रे सो यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता.

यामध्ये मुळ फिर्यादीतर्फे अॅड. संतोष वि. न्हावकर यांनी हजर होऊन फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून, आरोपींनी पोलीस कोठडीत असताना फिर्यादीस फोन करून धमकी दिल्याचे तसेच आरोपीविरद्ध पूर्वी 3 गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले व आरोपींना जमीन देण्यास विरोध केला होता व
सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना अँड दत्तूसिंग पवार यांनी आरोपींनी संगनमत करून व कट रचून खून केला असल्याचे मे.न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले होते सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावले.

यात मुळ फिर्यादीतर्फे अॅड. संतोष वि. न्हावकर, अॅड. राहुल रुपनर, अॅड. शैलेश पोटफोडे, सरकार पक्षातर्फे अँड.दत्तूसिंग पवार तर समरसेनजीत गायकवाड तर्फे अँड. आर.आर.पाटील व आरोपी अजित गायकवाड तर्फे अँड.जे.ए.कांबळे हे काम पाहत आहेत.

Tags: Adv Santosh NhavakarCrimeNCP Sharad Pawar partyPramod gaikwad
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात पोलिसांना सापडले बारा बांगलादेशी ; या ठिकाणी होते वास्तव्यात

Next Post

सुभाष देशमुख यांचा लाडका सचिन झाला शिवसेनेचा सोलापूर शहर प्रमुख ; अनेकांना राजकीय धक्का

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सुभाष देशमुख यांचा लाडका सचिन झाला शिवसेनेचा सोलापूर शहर प्रमुख ; अनेकांना राजकीय धक्का

सुभाष देशमुख यांचा लाडका सचिन झाला शिवसेनेचा सोलापूर शहर प्रमुख ; अनेकांना राजकीय धक्का

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1993451
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group