सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांनी बुधवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकयांचे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासन आदेशानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील सप्टेंबर मध्ये मार्डी, वडाळा सर्कल मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे रक्कम 8 कोटी व ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांचे 13 कोटी याप्रमाणे 21 कोटी रक्कम अद्याप मिळालेली नाही.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सप्टेंबर मध्ये झालेल्या पंचनाम्यानुसार मंद्रुप व निबंर्गी सर्कलमधील शेतकऱ्यांचे 8 कोटी व ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकयांचे 14.83 कोटी याप्रमाणे 22.83 कोटी रक्कम मिळालेली नाही. तरी सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील 21 कोटी व दक्षिण सोलापूर तालुक्यातील रक्कम 22.83 कोटी रक्कम नुकसानग्रस्त शेतकयांना त्वरीत मिळावी अशी मागणी केली आहे.
या मागणीसह मुंबईत गोवरचा धोका वाढला असून दिवसे-दिवस रुग्ण देखील वाढत आहेत. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात देखील आरोग्य विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राअंतर्गत असलेल्या गावातील बालकांची दक्षता म्हणून आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका याच्याकडून सर्वेक्षण करुन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यात गोवरचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागास सर्वेक्षण, तपासणी करुन उपाययोजना करण्याचे आदेश देण्याची विनंती आहे.



















