अँड प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यभरात गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अतिरेक केला जात आहे ती कारवाई त्वरीत थांबवावी अशी मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गायरान जमिनीवर राहण्यासाठी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी राज्यभरातील अधिकाऱ्यांनी एकतर्फी कारवाईला सुरुवात केली आहे गायरान जमिनीवर राहणाऱ्या लोकांना जिल्हा प्रशासनाकडून दमदाटी करून जमिनीवरून खुशकावून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे बहुतांश ठिकाणी तर रहिवाशांनी गावरान जमिनीवर बांधलेली घर देखील जिल्हा प्रशासनाकडून पाडण्यात आलेली आहेत यामुळे राज्यभरातील 22 लाख लोकांना शासनाच्या या एकतर्फी कारवाईचा फटका बसला आहे.
मुंबई उच्च न्यायलयाने गायरान जमिनीच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने शासनाची बाजू ऐकून घेतली पण रहिवाशांची बाजू ऐकून घेतली नाही एकतर्फी निर्णय दिला याच निकालाचा दाखला देत जिल्हा प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई केली जात आहे महाराष्ट्र शासनाने गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेवर मुदत वाढवून मागावी जमिनीवर राहत असलेल्या रहिवाशाला बांधलेली घरे नियमित करण्यासाठी तसा आदेश राज्यभरातील जिल्हा प्रशासनाला द्यावेत आणि तशी माहिती महाराष्ट्राच्या एडवोकेट जनरलने उच्च न्यायालयात सादर करावा करून महाराष्ट्राची भूमिका उच्च न्यायालयात स्पष्ट करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली.



















