Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

फारुख शाब्दी जिंकले, बाकी सर्वच हरले ..!  सोलापूर शहर मध्य मतदारसंघात हे काय घडले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 November 2024
in Election
0
फारुख शाब्दी जिंकले, बाकी सर्वच हरले ..!  सोलापूर शहर मध्य मतदारसंघात हे काय घडले
0
SHARES
4.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फारुख शाब्दी जिंकले, बाकी सर्वच हरले ..!  सोलापूर शहर मध्य मतदारसंघात हे काय घडले

सोलापूर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षात राहणारी ठरली आहे. एका मुस्लिम समाजावर आमदार होऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असले तरी या निवडणुकीत एम आय एम चे उमेदवार फारूक शाब्दि यांनी मात्र सर्वांचे मन जिंकली आहेत. या निवडणुकीचा निकाल आणि मिळालेले मते पाहता फारूक शाब्दि जिंकले आणि इतर सर्वच हरले असेच म्हणावे लागेल.

काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने त्यांच्या मतदारसंघात आमदार होण्यासाठी अनेक इच्छुकांना संधी निर्माण झाली. काँग्रेस पक्षाकडून मोची समाज आणि मुस्लिम समाज उमेदवारीसाठी आक्रमक पाहायला मिळाला. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ही इच्छा व्यक्त केली होती.

काँग्रेस पक्षाने सुरुवातीला बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला परंतु मिस्त्री यांनी नकार दिला त्यामुळे मुस्लिम आणि मोची समाजाला उमेदवारी न देता चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली.

दुसरीकडे फारूक शाब्दि हे तर एम आय एम कडून फिक्स होते. हा मतदारसंघ पारंपारिक शिवसेनेचा असल्याने शिवसेनेने सुद्धा या मतदारसंघातून मागणी केली होती. त्यासाठी मनीष काळजे आणि शिवाजी सावंत हे इच्छुक होते. जागा वाटपाच्या ॲडजस्टमेंट मध्ये ची जागा भाजपने घेतली. देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली.

एकूणच या मतदारसंघाचा विचार केला तर 2009,  2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत प्रत्येक वेळी चौरंगी, पंचरंगी लढती या ठिकाणी होतात.  यामध्ये 2014 मध्ये प्रणिती शिंदे या 47 हजारावर गेल्या होत्या त्यानंतर त्या 52 हजारावर गेल्या.

एकूणच हे मतदान पाहता या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने किमान 70 हजार मतांची अपेक्षा ठेवली होती. तर एम आय एम पक्षाने 2019 वेळी मिळालेले 38 हजार 900 मध्ये त्यावर 60 ते 65 हजार मते घेण्याचा निश्चय केला होता.

या विधानसभा मतदारसंघात सर्व समाजाची मते जो उमेदवार घेतो तो विजय होतो असा इतिहास आहे. त्यामुळे फारूक शाब्दि यांना जरी मुस्लिम समाजाची 50 हजार मते या निवडणुकीत मिळतील आणि त्यावर आणखी दहा ते पंधरा हजार इतर समाजाची मते घेऊन विजयी होण्याचा संकल्प केला होता.
मतदान उत्साहात झाले काँग्रेसने ही ताकद लावली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही शेवटची निवडणूक समजून कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले.

या निवडणुकीत काँग्रेसला जरी विजय मिळणार नसला तरी ते किमान 30-35 हजारापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर आडम मास्तर पंधरा ते वीस हजार पर्यंत जातील असे अनेकांना अपेक्षा होती. भाजप आणि एमआयएम मध्ये अटीतटीची लढत होऊन दोघांपैकी एक जण विजयी होईल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु झाले उलटेच भारतीय जनता पार्टीने एक लाख पेक्षा अधिक मते घेतली.

भाजपचे देवेंद्र कोठे 48 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले पण शाब्दी यांनी 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत दोन 23 हजार मते अधिक घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यांना 61400 मते मिळाली. सोलापुरात एका मुस्लिम कार्यकर्त्याला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. भाजप सोबत शिवसेना होती, राष्ट्रवादी होती  त्यांचे अनेक कार्यकर्ते होते. यंत्रणा होती परंतु फारुक शाब्दी यांच्याकडे केवळ अससूद्दीन ओवेसी यांची सभा वगळता त्यांनी स्वतःचीच यंत्रणा लावली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मतदारांनी थेट नाकारले आणि ती मते भाजपला मिळाली त्यामुळे एमआयएमचा पराभव झाला.

एकूणच ही निवडणूक पाहता फारूक शाब्दि यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केल्याचे पाहायला मिळाले. त्यांची नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा तसेच या निवडणुकीत हिंदू मुस्लिम चा कोणताही वाद चव्हाट्यावर येऊ नये याची काळजी सुद्धा त्यांनी घेतली होती. आपल्या प्रचारात त्यांनी भगवे, निळे, हिरवे, पांढरे हे सर्व झेंडे वापरले. त्यामुळे संवेदनशील अशा या मतदारसंघात पोलिसांना ही कोणती अडचण झाली नाही.

Tags: AIMIM vs BJPCity Central assembly electionFarooq shabdi
SendShareTweetSend
Previous Post

जोडी नंबर वन : “समाधान आवताडे है तो सेफ है” ! मंगळवेढ्याला मिळाला दुसऱ्यांदा हक्काचा आमदार

Next Post

भाजपच्या सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यात केला हा रेकॉर्ड ; मनीष देशमुख ठरले विजयाचे शिल्पकार

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998870
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group