Saturday, October 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आता अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात दिव्यांग फ्रेंडली व्यवस्था ; सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 December 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात दिव्यांग भक्तांसाठी रॅंम्प उभारणी व इतर व्यवस्था केली जाणार आहे जेणेकरून दिव्यांग भक्तांना गर्दीचा त्रास वाचून दर्शन घेणे सुलभ होईल. अशा प्रकारचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग येथे केला जाणार आहे. अक्कलकोट नगरपालिकेच्या दिव्यांग निधीतून या व्यवस्थेचा खर्च करण्यात येणार आहे. याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून विस्तृत बैठक व नियोजन लवकर केले जाणार आहे असे यावेळी समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हयातील ग्रामीण भागातील असलेल्या दिव्यांगाची काळजी घेणे त्याचबरोबर त्यांचे संदर्भातील इतर अनुषंगिक कामे करण्या संदर्भात जिल्हा परिषदेने वेळोवेळी अनेक उपक्रम घेतलेले आहेत. त्याचबरोबर दिव्यांग निधीच्या खर्चाबाबत प्रत्येक महिन्याला आढावासुध्दा घेतला जातो. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग निधीच्या खर्चाची दक्षता घेण्याबाबत अनेकवेळा सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तालुका दौ-यावेळीसुध्दा याबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या. 

तरीसुध्दा याबाबत व इतर काही बाबींच्या तक्रारी होत आहेत. त्याचप्रमाणे निधी खर्च होत नसलेबाबत आरोप होत आहेत. यासंदर्भात तातडीने कारवाई होणे आवश्यक असल्याकारणाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगाच्या संदर्भातील निधी व त्याचेसंदर्भातील इतर कामकाजांचा आढावा घेणेसंदर्भात दिव्यांग कार्यशाळा घेणेचे निश्चित करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटविकास अधिकारी व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन कार्यशाळेच्या नियोजनाबाबत सुचना दिल्या. 

यावेळी समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधिन शेळकंदे, अपंग कल्याण विभागाचे समन्वयक बांगर, विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड आदी उपस्थित होते.

*कार्यशाळेची उद्दिष्ट्ये*

1. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगासाठी राखीव असलेला निधी खर्च झाला आहे किंवा कसे याबाबत खातरजमा करण्यात येईल.

2. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दिव्यांगाबाबतची याची अद्ययावत केल्या जातील. 

3. दिव्यांग व्यक्तीचे काही अर्ज, निवेदन, तक्रारी असल्यास त्यांचा निपटारा करण्यात येईल.

d. गावातील दिव्यांग व्यक्तींचे आरोग्य तपासणी करून योग्य त्या आरोग्य सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येईल.

5. दिव्यांग व्यक्तीच्या अडीअडचणीबाबत चर्चा करून त्यावर मार्ग काढला जाईल,

6. दिव्यांग यांचे करिता प स तसेच जिल्हा परिषद आणि राज्य स्तरावरील योजना बाबत माहिती कार्यशाळेत देण्यात येईल.

7. यापूर्वी लाभ दिलेले लाभार्थी आणि अद्याप एकदाही लाभ न दिलेले लाभार्थी यांची यादी व मागणी यांची यादी तयार करणे.

8. ग्रामपंचायत  आत्तापर्यंत 65 % खर्च झाला असून उर्वरित खर्च डिसेंबर 2022 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन कार्यशाळेत केले जाईल.

9. महापालिका/नगरपालिकेच्या स्तरावर शहरी व नागरी भागात सम दिनांकास या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

*कार्यशाळा स्वरूप*

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता दिव्यांग कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेच्यावेळी ग्रामपातळीवरच्या सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी उपस्थित राहतील. ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून आदर्श आचारसंहिता लागू आहे त्या ठिकाणी फक्त अधिकारी/कर्मचारी हेच सदरची कार्यशाळा घेतील 

तथापि ज्याठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका नाहीत अशाठिकाणी सरपंच, सदस्याच्या उपस्थितील कार्यशाळा घेतली जाईल. या कार्यशाळेत गावातील दिव्यांग व्यक्तीच्या उपस्थितीतमध्ये चर्चासत्र घडवून आणण्यात येणार आहे. ज्या दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीमध्ये येणे शक्य होईल त्यांना रितसर निमंत्रण देऊन बोलावून घेण्यात येईल. सदर कार्यशाळेमध्ये ग्रामपंचायतीकडील दिव्यांगासाठी आरक्षित असलेला निधी खर्च झाला किंवा कसे याबाबत आढावा घेऊन, जर काही कारणांस्तव निधी खर्च झाला नसेल तर त्याच्या खर्चाचे सुयोग्य नियोजन करण्यात येणार आहे. 

या कार्यशाळेमध्ये सर्वांच्या उपस्थितीत पुढीलप्रमाणे कामकाज करण्यात येणार आहे..

1. दिव्यांग निधीच्या खर्चाबाबतची तपासणी करण्यात येईल.

2. झालेल्या खर्चाबाबतचा विस्तृत अहवाल तयार करणे. 

3. खर्च न झालेल्या निधीचा विनियोग कशाप्रकारे करावयाचे याचे नियोजन करणे.

4. गावातील दिव्यांग व्यक्तींची याची सर्वांसमक्ष वाचून खात्री करून अद्ययावत करणे.. 

5. गावातील दिव्यांग व्यक्तींचे काही अर्ज, निवेदन व तक्रार प्रलंबित आहे किंवा कसे याची खातरजमा केली जाईल. जर काही तक्रारी अर्ज प्रलंबित असतील तर त्याचा निपटारा तिथेच करण्यात येईल .

गावातील दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी करण्याबाबत आवश्यकता असेलतर प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून त्याचे नियोजन केले जाईल. 

7. गावातील दिव्यांग व्यक्तींच्या असलेल्या अडीअडचणीबाबत चर्चा करून त्यासंबंधीचा अहवाल तयार करण्यात येईल.

SendShareTweetSend
Previous Post

नृत्यांगना नोरा फतेहीवर गुन्हा दाखल करा ; सोलापुरातून मागणी

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात प्रहारच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षसह 6 जणांवर गुन्हा दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात प्रहारच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षसह 6 जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001482
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group