Wednesday, May 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ने आमदार पीए भारावले ! भरगच्च एचओडी बैठकीतून विकासाचा सूर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 October 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. 13( जिमाका):- जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत यासाठी सर्व लोकप्रतिनिधी यांचे स्वीय सहाय्यक व सर्व शासकीय विभाग प्रमुख यांची संयुक्त आढावा बैठक घेण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत असून सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून संबंधित लोकप्रतिनिधी यांच्या स्वीय सहाय्यक यांच्याकडून आलेले प्रश्न, सूचना यावर विहित नियमावलीचा अवलंब करून ते प्रश्न तात्काळ सोडून सर्वसामान्यांना न्याय द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व शासकीय विभाग प्रमुख व जिल्ह्यातील सर्व आमदारांचे स्वीय सहाय्यक यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधीन शेळकंदे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासह अन्य विभाग प्रमुख तसेच लोकप्रतिनिधी यांचे स्वीय सहाय्यक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की, लोकप्रतिनिधी यांच्या स्वीय सहाय्यकांनी मांडलेले प्रश्न यावर संबंधित विभाग प्रमुख त्वरित कार्यवाही करून त्याचा अहवाल पंधरा दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करतील व प्रत्येक महिन्यातून एकदा अशी संयुक्त बैठक घेण्यात येऊन त्या बैठकीत सर्व सामान्य नागरिकांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या बैठकीस उपस्थित आमदारांचे स्वीय सहाय्यक यांना प्रश्न व सूचना मांडण्याबाबत सुचित केले त्यानुसार आपले सेवा केंद्र सुरू करणे, गौण खनिज निधी वापराबाबत, गायरान जमीन, शेती महामंडळाच्या जमिनीचा वापर, खंडकरी शेतकरी यांच्या जमिनी, गुंठेवारी अंमलबजावणी करणे, नैसर्गिक आपत्तीतील अनुदान मिळणे, जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती करणे, जिल्ह्यातील चारा व पाणी टंचाई बाबत नियोजन करणे, जेऊर (ता. करमाळा) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आवश्यक जागेबाबत निर्णय घेणे, करमाळा येथील पंचायत समिती व तहसील कार्यालय दुरुस्तीसाठी निधी मिळणे, सोलापूर शहरातील एनटीपीसी व सिमेंट कारखान्याची वाहतुकीसाठी बाह्यवळण काढणे, कुडल संगम येथे पुस्तकांचे गाव निर्माण करणे, पाणंद रस्ते मोहीम राबवणे, एमआरजीएस अंतर्गत कामे घेणे, सांगोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याबाबत मीटिंग घेणे, चिंचोली येथील तलावात पाणी सोडणे, सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथील शंभर बेडचे रुग्णालय तयार असून फर्निचरसाठी निधी देणे, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देण्याबाबत बँका टाळाटाळ करत असल्यास त्याबाबत लक्ष देणे, माढा येथील भूसंपादनाबाबत स्वतंत्र मिटिंग घेणे, म्हैसाळ पाण्याबाबत निर्णय घेणे आदी प्रश्न, सूचना स्वीय सहायक यांच्याकडून मांडण्यात आल्या.तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनी यात लक्ष घालून त्या त्वरित सोडवण्याबाबत अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते- पाटील, संजयमामा शिंदे, बबनदादा शिंदे, शहाजी बापू पाटील, सुभाष देशमुख, राम सातपुते, समाधान आवताडे तसेच आमदार प्रणितीताई शिंदे यांचे स्वीय सहाय्यक या बैठकीस उपस्थित राहून त्यांनी आपापल्या मतदारसंघातील उपरोक्त प्रमाणे विविध प्रश्न मांडले. तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अशा पद्धतीने बैठक घेतल्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानून यातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न अधिक गतीने मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला.

SendShareTweetSend
Previous Post

बापरे ! सोलापूर शहरात आहेत तब्बल इतके हजार भटके व मोकाट कुत्रे ; महानगरपालिकेने हाती घेतली ही मोहीम

Next Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी मुक्कामी ; सोमवारी भरगच्च बैठका अन् बरेच काही ; असा आहे दौरा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी मुक्कामी ; सोमवारी भरगच्च बैठका अन् बरेच काही ; असा आहे दौरा

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980107
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group