Monday, July 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया थांबवली ! या तारखेपर्यंत पुढे ढकलली

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 October 2024
in Co -operative
0
ब्रेकिंग ! सोलापूर बाजार समितीसाठी १० नोव्हेंबरला मतदान ? सात ते अकरा ऑक्टोबर अर्ज भरणा
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया थांबवली ! या तारखेपर्यंत पुढे ढकलली

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती या निवडणुकीसाठी सात ते 11 ऑक्टोबर दरम्यान अर्ज विक्री आणि स्वीकृती तसेच 14 ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी आणि 10 नोव्हेंबरला मतदान 11 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. सोमवारी जिल्हा उप निबंधक कार्यालयात अर्ज विक्री सुरू झाली. परंतु बाजार समितीची निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे तसे आदेश राज्याच्या पणन विभागाने काढले आहेत.

राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपविलेली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संबंधित जिल्हयातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका घेण्याकरीता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) म्हणून घोषित केलेले आहे.

ज्याअर्थी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थाच्या कार्यालयातील तसेच सहाय्यक निबंधक यांचे कार्यालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी यांचे आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कामकाजासाठी नियुक्तीचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांनी काढल्याने, निवडणूकीस पात्र असणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यामध्ये अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे अडचणीचे होणार आहे.

ज्याअर्थी, कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका महाराष्ट्र राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घेणे क्रमप्राप्त आहे, असे शासनाचे मत झाले आहे.

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनयमन) अधिनियम १९६३ मधील कलम १४(३) (अ) च्या तरतूदीअन्वये प्राप्त अधिकारांनुसार महाराष्ट्र शासन असे आदेश देत आहे की:-

“ज्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार घेणे क्रमप्राप्त आहे अशा बाजार समित्यांच्या निवडणूका वगळून उर्वरित सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करुन दि.३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. ”

Tags: DDR officeKiran gaikwadसोलापूर बाजार समिती
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात एकनाथ भाईंची शिवसेना एकवटली ! सोलापुरातील पाच जागांवर दावा ; दोन इच्छुकांमध्ये सीएम ‘सुवर्ण मध्य’ काढणार का?

Next Post

सोलापुरातील लाडक्या बहिणींच्या स्वागताला जिल्हा प्रशासन सज्ज ; कार्यक्रमाकडे जिल्ह्याचे लक्ष

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1992732
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group