सोलापूर : बुधवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात येऊन एका महिलेने बराच वेळ गोंधळ घातला. शिक्षण विभागाने मला फसवले असून मी तात्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना मोठी रक्कम दिल्याचा आरोपी तिने केला आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जाहीर यांनी मात्र मी तुम्हाला ओळखत नाही, आमच्याकडे सीसीटीव्ही आहेत असे होत नाही म्हणून तिच्यापासून सुटका करून घेतली. या घटनेनंतर हा काय नवीन प्रकार म्हणून शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जाकीरा फिरदोस गफ्फार शेख, शाहिद उल्लू खान या दोघांना फेक शिक्षणाधिकारी म्हणून शाळा तपासणी करत असताना पकडले. 22 डिसेंबर 2022 रोजी वळसंग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा देखील झाला आहे. संबंधित महिलेने गुरुवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात येऊन मोठा गोंधळ केला. तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी मला, शिक्षण खात्याचे ओळखपत्र बनवून दिले. शिक्षण खात्यात भरपूर नोकऱ्या आहेत, उमेदवार आणा असे सांगत पैसे घेण्यास सांगितले. जवळपास 20 ते 22 लाख रुपये मी तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला दिले असे गंभीर आरोप यावेळी केले.
प्रभारी शिक्षण अधिकारी संजय जावीर हे मिटिंग संपवून जाताना जाकिरा शेख या महिलेने अडविले साहेब मला फसवले गेले, तुम्ही देखील त्यात सहभागी आहात असेही आरोप महिलेने केले. यावेळी प्रभारी शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी मी तुम्हाला ओळखत नाही असे स्पष्टपणे सांगत निघून गेले.
दरम्यान ती महिला काय म्हणते पहा हा व्हिडीओ…



















