सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या संचालक मंडळाची सभा उपनिबंधक कार्यालयातील ढोणे आर. एन.यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत विवेक लिंगराज यांची चेअरमनपदी, तर व्हाइस चेअरमनपदी सुहास चेळेकर यांचे एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीनंतर पंडित भोसले, व्ही,आर.गरड, अशोक भोसले , वामनराव नवले, डी. एस, कुलकर्णी, बीटी मोहिते, प्रकाश शेटे, दयानंद परिचारक आदींनी अभिनंदन केले. बैठकीस तज्ञ संचालक डॉक्टर एस पी माने, ज्येष्ठ संचालक,श्रीशैल देशमुख, संचालक दीपक घाडगे, हरिबा सप्ताळे, धन्यकुमार राठोड, अनिल जगताप, दत्तात्रय घोडके, विष्णू पाटील, त्रिमूर्ती राऊत, सुंदर नागटिळक, शहाजहान तांबोळी, शेखर जाधव, सुखदेव भिंगे, श्रीमती मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी आदी संचालक व सचिव दत्तात्रय देशपांडे सुभाष काळे अशोक पवार, विनोद कदम आदी उपस्थित होते.
निवडीनंतर ढोणे यांच्या हस्ते नूतन चेअरमन वाईस चेअरमन यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले .याप्रसंगी माजी चेअरमन हरिबा सपताळे,व्हाइस चेरमान धन्यकुमार राठोड यांचेही संचालक मंडळाच्या वतीने आभार व अभिष्टचिंतन व्यक्त करण्यात आले.
















