सोलापूर : करमाळा तालुक्यातील सोगाव (प) इथले पवार हे शेतकरी कुटुंब मागील काही दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण करीत आहे. करमाळा भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिमटे यांनी त्यांच्या 37 गाई हिसकावून घेऊन गेल्यामुळे हे कुटुंब रस्त्यावर आले आहे त्यामुळे हे उपोषण करण्यात येतयं. यापूर्वीही ते उपोषणाला बसले होते आमदार अमोल मिटकरी यांनी या उपोषणाला भेट दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. उपोषणकर्त्यांमध्ये अक्षय पांडुरंग पवार व ज्ञानेश्वर पांडुरंग पवार यांचा समावेश आहे.
भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या विरोधात हे उपोषण सुरू आहे. दरम्यान पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ अक्षय पवार यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यास अडवल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सदर बजार पोलिस ठाण्याकडे रवाना केले.
दरम्यान त्याचा बंधू ज्ञानेश्वर पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली करमाळा भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिमटे यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही पोलीस जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्याने केला आहे..
सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...