Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांची ग्वाही ; नेत्रदान चळवळीत प्रशासन म्हणून आराधना संस्थेस कायम सहकार्य

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 January 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आराधना सामाजिक संस्थेने मनोरंजनातून नेत्रदान प्रचार प्रसार करण्याचा जो उपक्रम हाती घेतला आहे तो उपक्रम नसून त्यांनी उभी केलेली चळवळ आहे. खरे तर हे  काम प्रशासनाचे आहे मात्र आराधनाच्या या कार्यास प्रशासन म्हणून आमचा कायम पाठिंबा राहील अशी ग्वाही देताना आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दृष्टी बाधितांना आणि पत्रकारितक्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना आदर्श पुरस्काराने गौरविणे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले.

आराधना संस्था आणि मधुरिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी फडकुले सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर माधुरी वाळवेकर, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय सुरवसे, उद्योजक अजित कोठारी, संस्थेच्या अध्यक्षा मयुरा पोतदार, उपाध्यक्ष शरद पोतदार, सचिव नंदकुमार महामुनी, सहसचिव अमोल पोतदार, निमंत्रित दत्ता काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात बीएमसी मुंबईचे टेलिफोन ऑपरेटर मनोहर सुतार व महापालिकेचे लिपिक सतीश वाघमारे यांना आदर्श दृष्टिबाधित कर्मचारी पुरस्कार देण्यात आला. अकलूज येथील लोकमतचे जेष्ठ पत्रकार राजीव लोहकरे व सोलापूर सिंहासनचे संपादक प्रशांत कटारे यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

या कार्यक्रमात नेत्ररोग तज्ञ डॉक्टर वाळवेकर यांनी नेत्रदानाबाबत माहिती, समज, गैरसमज व आवाहन याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रारंभी सचिव महामुनी यांनी स्वागत केले तर उपाध्यक्ष शरद पोतदार यांनी प्रास्ताविकात आराधना संस्थेची माहिती दिली. यावेळी मनोरंजनपर एन ए बी विद्यार्थ्यांच्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिज भानप व अनुराधा गंगूल यांनी केले. या कार्यक्रमास वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाची सांगता दृष्टी बाधित कलाकारांनी सादर केलेल्या सुश्राव्य गीतांनी झाली. तसेच यावेळी एन ए बी निवासी अंधकार्यशाळेत घेण्यात आलेल्या गायन/ वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस वाटप करण्यात आले .

SendShareTweetSend
Previous Post

भाजप तालुकाध्यक्षाकडून अन्याय ; युवकाचा सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

Next Post

सोलापुरात सुरेश पाटलांकडून समविचारी आघाडीचा होतोय उदय ; ‘अण्णा’ महत्वपूर्ण वक्तव्य करण्याच्या तयारीत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात सुरेश पाटलांकडून समविचारी आघाडीचा होतोय उदय ; 'अण्णा' महत्वपूर्ण वक्तव्य करण्याच्या तयारीत

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000898
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group