Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर गड्डा यात्रा ! जिल्हा प्रशासनाकडून सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीवर जबाबदारी निश्चित

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 January 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  श्री सिद्धेश्वर महायात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी व पंचकमिटी यांनी नेमून दिलेली कामे व जबाबदाऱ्या चोख, काटेकोरपणे पार पाडाव्यात. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी आज येथे दिल्या.

श्री सिद्धेश्वर महायात्रा 2023 च्या आयोजनाबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बहुउद्देशीय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीस तहसीलदार (महसूल) दत्तात्रय मोहोळ, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले आदिंसह विविध विभागांचे अधिकारी, पंच कमिटी व यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

श्री सिद्धेश्वर महायात्रेंतर्गत यात्रा कमिटी व पंचकमिटी यांनी नेमून दिलेली कामे करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करावी. तसेच प्रत्येक काम सूचिबद्ध करून विहित मुदतीत पूर्ण करावे, असे सांगून शमा पवार म्हणाल्या, होम मैदान येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस व वैद्यकीय सेवा इत्यादिंसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष, रूग्णवाहिका व वैद्यकीय कुमक,  अग्निरोधक यंत्रणा आदि यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात. 24X7 आपत्कालिन मदत व प्रतिसाद केंद्र उभारावे. अन्नातून विषबाधासारखे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने् भेसळयुक्त पदार्थ विकले जाणार नाहीत, यासाठी दररोज अन्नपदार्थांची तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

शमा पवार म्हणाल्या, मंदिर कमिटीने प्रत्येक ठिकाणी उपकमिटी नेमावी व प्रत्येक उपकमिटीवर एक नोडल अधिकारी नेमून त्यांचे नाव व संपर्क क्रमांक जिल्हा प्रशासनाकडे व अन्य शासकीय विभागांकडे द्यावा, जेणे करून यात्रा कालावधीत परस्पर समन्वय ठेवणे सोयीचे होईल. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहावे. यात्रेदरम्यान अवैध व्यवसाय चालणार नाहीत, यासाठी पुरेशी काळजी घ्यावी. जागोजागी कचराकुंड्या ठेवून परिसर स्वच्छ ठेवावा. पिण्याचे पाणी व प्रसाधन गृहे आदिंची व्यवस्था करावी, असे त्या म्हणाल्या.

शमा पवार म्हणाल्या, मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी होत असल्याचे लक्षात घेऊन सीसीटीव्ही व्यवस्था, चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. अक्षता सोहळा भाविकांना पाहता येईल, यासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करावी. मनोरंजन नगरीमध्ये सुरक्षित वीज पुरवठा करावा. शोभेचे दारूकाम, फटाके, स्फोटके याबाबतीत शासनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. रोड रोलर फिरवून होम मैदानची स्वच्छता ठेवावी. हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. होम मैदानमधील संपूर्ण ग्राऊंड व मनोरंजन नगरीमधील स्टॉलधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंजूर आराखड्यानुसार परवानगी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी दत्तात्रय मोहोळ यांनी आवश्यक विविध मौलिक सूचना केल्या. या बैठकीत बॅरिकेटस्‌, स्वयंसेवकांची मदत, पार्किंग झोन, आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावणे, वाहतूक व्यवस्था व नियंत्रण, अतितात्काळ प्रसंगी बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग व व्यवस्था यासह विविध महत्वांच्या बाबींवर सर्वंकष चर्चा करण्यात आली. विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : जिल्हा नियोजन समितीवर 20 नवीन सदस्यांच्या निवडी ; शहाजी बापूंचे ‘रफिक भाई समंध ओके’ अमोल शिंदेंसह शहरातील यांना संधी

Next Post

सोलापूरकरांनो यंदाच्या गड्डा यात्रेत हे असणार आकर्षण ; 13 ते 17 जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरकरांनो यंदाच्या गड्डा यात्रेत हे असणार आकर्षण ; 13 ते 17 जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000883
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group