सोलापूर : जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यासह जिल्हा परिषद मधील सर्व जिजाऊ – सावित्री लेकींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, शिक्षणाधिकारी संजय जावीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकांदे, कार्यकारी अभियंता यांच्यासह जिल्हा परिषद मराठा सेवा संघ अध्यक्ष अविनाश गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्वान 10 महिलांचा सन्मान करण्यात आला.
सीईओ आव्हाळे व निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजमाता जिजाऊ या स्वराज्य निर्मितीच्या प्रणेत्या होत्या, त्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्यांचा आदर्श सर्व युवती महिलांनी घ्यावा असे आवाहन करत जिल्हा परिषद मराठा सेवा संघाच्या या उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश गोडसे यांनी केले, सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केले.
कार्यक्रमास कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, राजेश देशपांडे, गिरीश जाधव विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी माँसाहेब जिजाऊ यांची दूरदृष्टी या विषयावर व्याख्यान झाले.





















