Thursday, May 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सीईओ मनीषा आव्हाळे यांचे युवा वर्गाला आवाहन ; वाहतूक नियमांचे पालन करा, हे तुमचे कर्तव्य आहे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 January 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. 11, (जि. मा. का.) : महामार्गावरील अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक असून, वाहतूक नियमांचे पालन करणे ही स्वयंशिस्त बनली पाहिजे. वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, रस्ता सुरक्षा अभियान हे सप्ताहापुरतेच मर्यादित न राहता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आज येथे केले.

34 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सार्वजनिक बांधकाम मंडळ, परिवहन विभाग, शहर व ग्रामीण पोलीस विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत असून, ते 17 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

नियोजन भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर आणि अमरसिंह गवारे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे चिटणीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ठाकरे, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले व्यासपाठीवर उपस्थित होते.

अपघातामुळे जीवितहानी होण्याबरोबरच संबंधित कुटुंबावरही परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी, अशी अपेक्षा व्यक्त करून मनिषा आव्हाळे म्हणाल्या, वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, या माध्यमातून नागरिकांकडून रस्ते सुरक्षा अभियान वर्षभर राबवले गेले पाहिजे. अपघात कमी करण्यासाठी उपस्थित युवा वर्गाने कुटुंबात, समाजात वाहतूक नियमांचा प्रसार करणारे दूत व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

1 नोव्हेंबरपासून ऊस ट्रॅक्टरच्या ट्रेलरला रेडियम लावण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे गेल्या अडीच महिन्यात यासंदर्भातील एकाही अपघाताची नोंद झाली नाही, असे सांगून हिंमतराव जाधव म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात सन 2021 मध्ये रस्ते अपघातातील मृतांची संख्या 616 असून, 2022 मध्ये ही संख्या 702 पर्यंत वाढली आहे. याचा परिणाम मृत व्यक्तिच्या कुटुंबावरही होतो. मागील वर्षी देशभरात 1 लाख 55 हजार 622 जण रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले असून पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धातील बळींपेक्षा ही संख्या जास्त आहे. याचे गांभीर्य ओळखून वाहतूक नियमाचे पालन व्हावे. युवा वर्गात बदल घडविण्याची ताकद असून, याबाबत त्यांनी अधिक दक्ष राहावे. रस्ते अपघातातील मानवी चुका आपण कमी करू शकतो. जनतेचे सहकार्य मिळाल्याशिवाय रस्ते अपघातांची संख्या कमी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शमा पवार म्हणाल्या, रस्ते अपघाताचे चित्र बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहतूक नियमावलीचा प्रत्येकाने अंगिकार करावा. आपली सुरक्षा आपल्याच हातात असून पादचारी व वाहनचालक या दोघांनीही याचे भान राखणे गरजेचे आहे.

दीपाली काळे म्हणाल्या, युवा पिढी देशाचे भावी आधारस्तंभ असून, रस्ते सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावर आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहात देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचे प्रत्येकाने पुढे वर्षभर पालन करणे आवश्यक आहे.

यावेळी संजय नवले, श्री. तिरणकर यांनी मार्गदर्शन केले. अमोल घुले यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेची शपथ दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री. जेवूरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रियांका माने यांनी केले. अमरसिंह गवारे यांनी आभार मानले.

रस्ते अपघातातील जखमी व्यक्तिंना मदत केल्याबद्दल श्रीमती कांता मच्छिंद्र गुंड यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या ठिकाणी आशुतोष नाटकर आणि त्यांच्या पथकाद्वारे रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्याविषयी पथनाट्य सादर करण्यात आले.

यावेळी मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, अन्य शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मोटर ड्रायव्हिंग स्कूल, ऑटोरिक्षा संघटना, पीयुसी सेंटर यांचे प्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दोन दिवस सोलापूर मुक्कामी ; श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्यास उपस्थिती

Next Post

सोलापुरात झेडपीत जिजाऊ-सावित्रीच्या लेकींचा असा झाला गौरव ; राजमाता जिजाऊ या महिलांच्या प्रेरणस्थान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात झेडपीत जिजाऊ-सावित्रीच्या लेकींचा असा झाला गौरव ; राजमाता जिजाऊ या महिलांच्या प्रेरणस्थान

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979473
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group