सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सोमवारी सकाळी साडेदहा वाजता जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा रुजू झाले आहेत. अतिरिक्त पदभार असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडून त्यांनी सीईओ पदाचा पदभार घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 24 दिवसाच्या ट्रेनिंग साठी लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमी मसूरी या ठिकाणी गेले होते त्यांचा पदभार सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे देण्यात आला होता. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी आपला पदभार घेतला. नूतन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी त्यांचे स्वागत केले.