Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मंत्रालयीन प्रशासकीय कामात माहीर ! सोमनाथ वैदय दक्षिण विधानसभेच्या मैदानात ताकदीने उतरणार ; असे आहे आता पुढील नियोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 July 2024
in political
0
मंत्रालयीन प्रशासकीय कामात माहीर ! सोमनाथ वैदय दक्षिण विधानसभेच्या मैदानात ताकदीने उतरणार ; असे आहे आता पुढील नियोजन
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Oplus_0

मंत्रालयीन प्रशासकीय कामात माहीर ! सोमनाथ वैदय दक्षिण विधानसभेच्या मैदानात ताकदीने उतरणार ; असे आहे आता पुढील नियोजन

सोलापूर : तब्बल 19 वर्षांपासून मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजात माहिर असलेले आणि विकास कामांचा चौफेर अनुभव असलेल्या भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे स्विय सहाय्यक लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्व सोमनाथ (सोमेश) वैदय हे विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदार संघाच्या रण मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. अनेकांकडून तशी आग्रही मागणी होत असल्याने त्यांनी ही तयारी दर्शवली आहे.

सोमनाथ वैद्य हे गेल्या 19 वर्षांपासून मंत्रालय विधानभवनात स्वीय सहायक म्हूणन काम करीत असून त्यांना प्रशासकीय कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. सरकारी कामे व योजना कशी उत्तमपणे व जलद करून घेण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे.

भोसरीचे पैलवान आमदार महेश लांडगे यांचे ते स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. सोलापुरातील विविध पक्षातील नाराज लोकांकडून तसेच जनतेतूनही सोमनाथ (सोमेश) वैदय यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली जात आहे.

दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी अनुभवी कार्य कुशल असं नेतृत्व गरजेचे आहे. त्यामुळे वैद्य यांनी या रण मैदानात उतरावे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहू, अशी भूमिका अनेक जण व्यक्त करत आहेत. त्यामुळे दक्षिणच्या रण मैदानात उभारण्याच्या तयारीत सोमनाथ (सोमेश) वैद्य हे असल्याचे दिसून येते.

प्रशासकीय व सामाजिक कामाची बांधिलकी कायम जोपसणारे व्यक्तिमत्व सोमनाथ वैद्य हे उच्चशिक्षित असून त्यानी 2009 साली केसी विधी महाविद्यालय मुंबई विद्यापीठातून निधी शाखेचे शिक्षण पूर्ण केले. वैदय यांचा दयानंद महाविद्यालय सोलापूर ते मुंबई येथील केसी विधी महाविद्यालय चर्चगेट शिक्षण प्रवास सर्वसामान्यसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

कायद्याचे शिक्षण पूर्ण करीत असताना सोमनाथ वैद्य यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष यांचे स्वीय सहायक म्हूणन सन 2006 ते 2009 दरम्यान काम पहिले. तत्कालीन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री प्रा लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंत्रालयीन आस्थापनेवर स्वीय सहायक म्हूणन त्यांनी 5 वर्ष काम केले आहे.

लिंगायत समाजातील अनुभवी आणि धडपड करणारा युवक सोमनाथ वैद्य यांनी
या काळात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात अनेक समाजउपयोगी कामे केली असून कोरोना लॉकडाउन काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे.

गेल्या 10 वर्षात स्वतःच्या जन्मगावी शासननिधीच्या माध्यमातून त्यांनी गावाचा विकास घडवून आणला. याची दखल गावकरी यांनी घेऊन सोमनाथ वैद्य यांच्या वडिलांना गावातील लोकांनी बिनविरोध सरपंच केले आहे.

विविध देशातील अभ्यास दौऱ्यातून नव्या विकासात्मक संकल्पनाची माहिती
सोमनाथ वैद्य यांनी देशांतर्गत तसेच विविध देशातील अभ्यास दौऱ्यातून त्या त्या ठिकाणच्या विकासाचे वेगवेगळे प्रकल्प, विविध योजना याची माहिती घेतली आहे. दावोस, लंडन, पॅरिस, रोम इटली, दुबई, चीन तसेच अन्य युरोपिय देशाचा दौरा तीन वेळा करून त्यांनी नवीननवीन गोष्टी कौशल्य अवगत केल्या आहेत. त्या अभ्यासाचा दक्षिण मतदार संघाच्या विकासासाठी मोठी मदत होणार आहे.

स्वयंम शिक्षा एज्युकेशनल
फौंडेशनच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम

गेल्या 19 वर्षांपासून मंत्रालय विधानभवन प्रशासकीय पातळीवर सतत लोकांचा संपर्क ठेऊन सोमनाथ वैद्य हे अनेक गरजूना सढळ हाताने स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फौंडेशन च्या माध्यमातून मदत करत आहेत. फाउंडेशन च्या वतीने राज्यभरात अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून पत्रकारांच्या जवळपास 195 पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. आता रविवार दि.21जुलै रोजी गुरुपौर्णिमानिमित्त जुळे सोलापूर आणि दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागातील श्री स्वामी मंदिरात भक्तांना 51 हजार बेसन लाडू वाटप करण्यात येत आहे. 7 हजार छत्री वाटप करण्यात येणार आहे. महिला भगिनींना मदतीचा हात देण्याच्या उद्देशातून 5 हजार बचत गटातील महिलांना पर्स वाटप करण्यात येत आहे. पाच हजार युवकांना टी-शर्ट वाटप करण्यात येणार आहे.

उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान

कार्य कुशल असलेल्या सोमनाथ (सोमेश )वैद्य यांच्या कृषी आणि ग्रामविकास कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2023 चा सकाळ सन्मान पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. राजभवनातील सोहळ्यात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमनाथ वैद्य यांना सन्मानित केले आहे .

Tags: Vidhansabha electionदक्षिण सोलापूरसोमेश वैद्य
SendShareTweetSend
Previous Post

सुरेश हसापुरेंच्या विरोधात काँग्रेसचा गट सक्रीय ; पण प्रणिती ताई साधणार ‘करेक्ट टायमिंग’

Next Post

फडणवीसांप्रमाणेच सोलापूरचे ‘देवेंद्र’ उच्च पदाकडे जातील ; जगद्गुरूंचे मिळाले आशीर्वाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
फडणवीसांप्रमाणेच सोलापूरचे ‘देवेंद्र’ उच्च पदाकडे जातील ; जगद्गुरूंचे मिळाले आशीर्वाद

फडणवीसांप्रमाणेच सोलापूरचे 'देवेंद्र' उच्च पदाकडे जातील ; जगद्गुरूंचे मिळाले आशीर्वाद

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998925
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group