Friday, September 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

फडणवीसांप्रमाणेच सोलापूरचे ‘देवेंद्र’ उच्च पदाकडे जातील ; जगद्गुरूंचे मिळाले आशीर्वाद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 July 2024
in political
0
फडणवीसांप्रमाणेच सोलापूरचे ‘देवेंद्र’ उच्च पदाकडे जातील ; जगद्गुरूंचे मिळाले आशीर्वाद
0
SHARES
635
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फडणवीसांप्रमाणेच सोलापूरचे ‘देवेंद्र’ उच्च पदाकडे जातील ; जगद्गुरूंचे मिळाले आशीर्वाद

सोलापूर – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडवणीस यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना ५४ हजार वह्या वाटप या सेवाकार्य कार्यक्रमाचा शुभारंभ काशीपीठ जगद्गुरु श्री डॉ मल्लिकार्जुन विश्र्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला.

श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य माध्यमिक हायस्कूल, अक्कलकोट रोड सोलापूर येथे सोमवारी श्री १००८ काशीपीठ जगद्गुरु श्री डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, उपाध्यक्ष श्रीनिवास करली, भूपती कमटम, श्रीनिवास दायमा, प्रभाकर गणपा, मारेप्पा कंपली, दत्तात्रय पोसा, श्रीनिवास जोगी, अविनाश बेंजरपे, श्रीनिवास पुरुड, सिद्धाराम खजुरगी, रवीसिंग बुरानपुरे तसेच संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी व मुख्याध्यापक म्हमाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या आशीर्वचनपर मनोगतात जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, समाजाची गरज लक्षात घेऊन सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या नेतृत्वाची समाजालाही आवश्यकता असते. तात्यांचा वारसा घेऊन गरजवंतांसाठी पुढे येणाऱ्या देवेंद्र कोठे यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, ज्यांचा वाढदिवस आहे ते देवेंद्र फडणवीस आणि जे स्तुत्य उपक्रम राबवीत आहेत ते देवेंद्र कोठे या दोघांमध्ये नामसाधर्म्य आहेच, समाज हिताचे असेच कर्म देवेंद्र कोठे यांनाही निश्चित उच्च पदाकडे घेऊन जाईल.

याप्रसंगी प्रास्ताविकपर भाषणात ५४ हजार वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजक, भाजपा युवा नेते देवेंद्र कोठे म्हणाले, माझे आजोबा स्व. विष्णुपंत कोठे नेहमी म्हणायचे की डोक्यात ३६५ दिवस राजकारण ठेवू नये. निवडणुकीपुरते राजकारण करावे आणि उर्वरित दिवसांमध्ये आपल्या राजकीय पदाचा लाभ सर्वसामान्य गोरगरिबांना करून देण्यासाठी झटत राहावे. त्याच तत्वाचा आचरण करत मी उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमाने करतोय याचं समाधान वाटतं. बृह्णमठ होटगी पीठातील भक्तांसाठी गुरुपरंपरेतून निर्माण झालेले हे ध्यानमंदिर या उपक्रमाच्या शुभारंभासाठी उपलब्ध झाले हे देखील मी माझे भाग्य समजतो असेही  कोठे म्हणाले.

यावेळी त्यांनी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. पुढील पंधरा दिवस शहरातील विविध शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस  ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करणार असल्याचे सांगितले. शिवाय काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी हे आम्हां सर्वांचे प्रेरणास्त्रोत आहेत, महास्वामीजींच्या आशीर्वादाने वेगळीच ऊर्जा मिळाली असेही ते म्हणाले.

सदर कार्यक्रमास भाजपा चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, सुधाकर नराल, नागनाथ सोमा, मनोहर इगे, श्रीनिवास पोतन, रवी भवानी, मनोज कलशेट्टी, अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, धुळप्पा आळंद, सुनील अरळीकट्टी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य यशवंत आंदेवाडी, सुरजसिंह चौहान, पवन खांडेकर, सिद्धेश्वर कमटम, आकाश पडवळकर, रोहन जाधव,अश्विन कोडम, पवन यन्नम, शैलेश कडदास, अमन दुबास,  उदय कनकी, विक्रम कंबळी, सोमेश येलगेटी, बंटी कटकम,श्रीनिवास म्याडम पंतलु,अमोल कोंड्याल, त्रिमूर्ती बल्ला, राहुल गोयल,गजानन केंगनाळर आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Tags: Birthday celebrationDevendra fadnvisDevendra kotheDr Mallikarjun shivachary
SendShareTweetSend
Previous Post

मंत्रालयीन प्रशासकीय कामात माहीर ! सोमनाथ वैदय दक्षिण विधानसभेच्या मैदानात ताकदीने उतरणार ; असे आहे आता पुढील नियोजन

Next Post

महादेव कोगनुरे यांनी वाढवली शेतकऱ्यांशी ‘अटॅचमेंट ‘ ; दक्षिणचे प्रश्न घेऊ लागले जाणून

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
महादेव कोगनुरे यांनी वाढवली शेतकऱ्यांशी ‘अटॅचमेंट ‘ ; दक्षिणचे प्रश्न घेऊ लागले जाणून

महादेव कोगनुरे यांनी वाढवली शेतकऱ्यांशी 'अटॅचमेंट ' ; दक्षिणचे प्रश्न घेऊ लागले जाणून

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998417
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group