Thursday, August 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सिईओ दिलीप स्वामी यांनी सृष्टी पाटील या बालिकेस दिला अध्यक्षपदाचा मान …!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 January 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





करमाळा- जिल्ह्सात हजार मुलामागे फक्त ९२१ मुली आहेत. राज्याच्या सरासरीमध्ये सोलापूर जिल्हा खुप मागे आहे. मुलींची संख्यावाढ चिंताजनकआहे.  या साठी मुलींना सन्मान द्या असे सांगत बेटी बचाव व बेटी पढाव कार्यक्रमात सिईओ दिलीप स्वामी यांनी करमाळा तालुक्यांतील फिसरे गावातील कार्यक्रमात सृष्टी पाटील या बालिकेस अध्यक्षपदाचा मान दिला. मुलांना सन्मान द्या असा संदेश सिईओ दिलीप स्वामी यांनी या कार्यक्रमातून दिला. 

करमाळा तालुक्यांतील फिसरे येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्तर २ अंतर्गत युवा स्वच्छतादूत शिबीराचे आयोजन करणेत आले होते. या समारोप समारंभास उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी मनोज राऊत, डाॅक्टर पिंपळे, उप प्राचार्य किरदाट, कार्यक्रम अधिकारी नवनाथ राख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच प्रदीप दौंडे , उप सरपंच विजय औताडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मण राख, माजी उपसरपंच संदीप नेटके, पाणी फौडंशन चे प्रतिक गुरव उपस्थित होते. ग्रामसेवक दादासाहेब केवारे व रासेयो जिल्हा समन्वयक लक्ष्मण राख व दोन स्वयंसेवकांचा यावेळी गौरव करणेत आला. अध्यक्षपदाची मान दिलेले सृष्ट्री पाटील या बालिकेचा देखील गौरव करणेत आला.

 

अंगणवाडी सेविका ललीता वलटे , सलामा शेख  मदतनीस , अंगणवाडी चौधरी वस्ती, किर्ती बिराजदार, अंगणवाडी हुबेवस्ती , दिपाली कळसाईत अंगणवाडी भैरोबा वस्ती 

वि. कोर्टी 1 यांनी एकांकिका सादर करून डोळ्यात झणझणीत अंजन घालून मुलींचा टक्के वाढविण्याचे आवाहन केले. दौलत संपत रोकडे , सोनाली दौलत रोकडे आज कार्यक्रमाची अध्यक्ष सुष्टी  परमेश्वर पाटील इयत्ता पहिली, दोन मुली असणारे पालकांचा गौरव करणेत आला.


सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, विकास कामात राजकारण आणू नका. चांगले काम होणे साठी सेवेची सवय महत्वपुर्ण आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माध्यमातून स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविणेत येत आहेत. शासनास स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तीक शौचालय तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शौषखड्डे घेणेसाठी शासनास पुढाकार घ्यावा लागतो. असेही सिईओ स्वामी यांनी सांगितले.  आदी उपक्रम राबविणेत . या शिबीराच्या माध्यमातून “ नो नाॅलेज विदाऊट काॅलेज” असे नाही. कलागुणांना या शिबीरात विचारपीठ  मिळते.


वेळेचे महत्व लक्षात घ्या

…………. ……… 

महाविद्यालयीन जिवनात वेळेचे महत्व खुप महत्वाचे आहे. 

सोलापूर जिल्ह्सात एक हजार मुलांपाठीमागे ९२१ मुली आहे. यामुळे समाजात अराजकता निर्माण होणेची शक्यता आहे. राज्याचे सरासरीचे तुलनेत सोलापूर जिल्हा मागे आहे. राज्यात एक हजार मुलांचे पाठीमागं ९४६ मुली आहे. 


माझ्या दोन मुली माझा अभिमान- 

…………

सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, मला पण फक्त दोन मुली आहेत. दोन मुलींवर मी कुटूंब नियोजन केले आहे. मुलींना शिकवा. मुलींना वाढवा. बेटी बचाव बेटी पढाव भिंतीवर लिहून होणार नाही. 


सायकल बॅंकेत ३ हजार सायकली .! 

…………..

सोलापूर जिल्ह्सात सायकल बॅंकेत ३ हजार सायकली आहेत. ७ हजार मुली सायकली विना आहेत. अद्याप मुलीसाठी साडेतीन हजार मुली सायकलीं विना आहेत. सायकल बॅंके साठी खुप प्रतिसाद मिळत आहे.

जलजीवन मिशन ची कामे वेळेत पुर्ण करा – 

…………

जलजीवन मिशन अंतर्गत फिसरे गावास ७० लक्ष रूपये मंजूर झाले आहेत. या  योजनेची निविदा प्रक्रिया पुर्ण होत आहे. ही योजना वेळेत पुर्ण करा. कामे चांगल्या दर्जाची होतील या कडे लक्ष द्या. हर घर नल से जल या अभिसानातून प्रत्येक घरास नळकनेक्शन द्या असे आवाहन केले आहे. असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांनी जिल्हयात  बेटी बचाव बेटी पढाओ अभियान प्रभावी पण राबविणेत येत असल्याचे सांगितले. 

बेटी बचाव या बाबत गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी आशा क्लिनीक ची सोय प्रत्येक गावात सोय करणेत आली आहे. या आशा क्लिनिक मध्ये असणारे आशांना डिजीटल धर्मामिटर, गोव्याचे कीट, न्युगोलायजर, आॅक्सीमिटर , वेगवेगळे वस्तुंचे किट देणेत येत आहे. गावात एक खोली आशा क्लनिक साठी उपलब्ध करून देणेत येत असल्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले. ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी युनिफार्म देणेत आलेला आहे. आकाशी रंगांचा युनिफाॅर्म देणेत आलेला आहे. तालुक्यांतील सर्न कर्मचारी युनिफार्म मध्ये असणार आहेत. राज्यातील एखाद्या पंचायत समिती अंतर्गत असलेल्या सर्व ग्रामपंचायती मध्ये एकाच रंगात युनिफार्म असलेला करमाळा हा एकमेव तालुका असणार आहे. असेही गटविकास अधिकारी राऊत यांनी सांगितले.

माजी उपसरपंच संदीप नेटके,यांनी मनोगत व्यक्त केले. 


गटविकास अधिकारी राऊत यांचा करमाळा पॅटर्न …! 

आशा क्लनिक ची नवी आशा ….! 

…………..,


ग्रामपंचायत कर्मचारी यांना कार्पोरेट कंपनीतील कर्मचारी यांचे प्रमाणे आकाशी कलरचा ड्रेस तर आशा चा चांगला उपयोग करमाळा तालुक्यांत केले आहे. नवी दिल्लीत ज्या प्रमाणे मोहल्ला क्लिनिक झाली त्या धर्तीवर करमाळा तालुक्यात प्रत्येक गावात आशा क्लनिक सुरू करून करमाळा पॅटर्न सुरू ठेवला आहे.२२०  ग्रामपंचायत कर्मचारी यांना ड्रेस कोड केला आहे. सिईओ स्वामी यांनी या नाविण्यपुर्ण उपक्रमाबद्दल कौतुक केले.


सिईओ व बालिकांची बैलगाडीतून मिरवणूक 

…………

सिईओ दिलीप स्वामी व मुली वाचवा मुली शिकवा या अभियान अंतर्गत मुलींची सिईओ दिलीप स्वामी, जिल्हा प्रकल्प अधिकारी जावेद शेख व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे सह गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढत गावात मुली वाचवा व मुली शिकवा यांचा संदेश देणेत आला. वाजत गाजत मुली वाचवा अभियानाचा जागर करणेत आला.

SendShareTweetSend
Previous Post

अरे..रे ..! इलेक्ट्रो प्रदर्शनाकडे सोलापूरकर यंदा पाठ फिरवणार? ; हे आले कारण समोर

Next Post

वेक अप सोलापूर फाउंडेशनने घेतली अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची भेट ; या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वेक अप सोलापूर फाउंडेशनने घेतली अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची भेट ; या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994530
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group