Friday, October 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अखिल भारतीय गवळी समाजाचे सोलापूरात होणार राष्ट्रीय अधिवेशन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 June 2024
in Social
0
अखिल भारतीय गवळी समाजाचे सोलापूरात होणार राष्ट्रीय अधिवेशन
0
SHARES
193
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अखिल भारतीय गवळी समाजाचे सोलापूरात होणार राष्ट्रीय अधिवेशन

सोलापूर : अखिल गवळी समाज महासंघ आयोजित अखिल भारतीय गवळी समाज अधिवेशन 2024 मध्ये घेण्यात येणारे विषय व ठराव याबाबतचे चर्चासत्र किल्लेदार मंगल कार्यालय, सोलापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

प्रारंभी शिवपार्वतीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन  झाले. याप्रसंगी मंचावर ज्ञानेश्वर अंजीखाने, नारायण  बहिरवाडे (चिंचवड पुणे), सुरेश शहापूरकर, रमेश अंबरखाने, वसंत नामागवळी (मनमाड),  प्रवीण हुंडीवाले (अकोला), संगीता लकडे (चाळीसगाव),  प्रा किसन झिपरे (अक्कलकोट) श्री प्रा.भालचंद्र हूच्चे (उस्मानाबाद) , अनिल नायकु, शंकर झारखंडे, व्यंकटेश लंगोटे (रायचूर ), सुहास भागानगरे (हैद्राबाद ), सुरेखा अंजीखाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना  ज्ञानेश्वर अंजीखाने म्हणाले, गवळी समाजाचे 56 वर्षानंतर होणारे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी चार राज्यातील समाज बांधव एकत्र येत  आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. यानंतर या चर्चासत्रामध्ये समाजातील सामाजिक, शैक्षणिक, शासकीय त्याचबरोबर राजकीय विषयांवर आधारित तब्बल 25 ठराव मांडण्यात आले व उपस्थित समाज बांधवांनी या ठरावांना मान्यता दिली. चर्चासत्राच्या मध्यांतरानंतर  चार राज्यातून आलेल्या कारभारी, दैवमंडळी, समाज प्रमुख व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खुल्या चर्चांमधून समाजापुढे अनेक विषय  ठेवत आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी  चारही राज्यांच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कारभारी, दैवमंडळी, पंच यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

नारायण बहिरवाडे म्हणाले, समाजाने काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. आपल्या या समाज व्यवस्थेमध्ये काळानुरूप  बदल करत समाजाचा विकास साधूया तसेच जास्तीत जास्त शासकीय योजना मिळवूया असा आशावाद व्यक्त केला.  रमेश अंबरखाने बोलताना म्हणाले, गवळी समाजातील  सर्व पोटजाती एकत्र येऊन शासन दरबारी आपण आपल्या मागण्या मान्य करून घेऊया, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बोलताना सुरेश शहापूरकर म्हणाले, एका नव्या परिवर्तनाची ही सुरुवात आहे समाजाची एकजूट साधन सामाजिक विकास घडवून आणू, असा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रानसर्जे यांनी केले तर आभार  ज्ञानेश्वर अंजीखाने यांनी मांडले. या चर्चासत्राप्रसंगी गंगाधर औशीकर(नांदगाव ), शिवाजी पंगुडवाले(धाराशिव), विजयदत्त लकडे, प्रभाकर जानगवळी, संजय जानगवळी, सविता नायकू, शैला अंजीखाने, अर्चना अंजीखाने, संजय शहापूरकर,  राजू परळकर, राहुल दहिहंडे, कृष्णा भास्कर, पांडू परळकर श्रीकृष्ण झिपरे, किसान अंजीखाने, सिद्धू बडवणे, केदार जानगवळी, मनोज मलकुनाईक या मान्यवरांसह  महाराष्ट्र,  गोवा, कर्नाटक, व तेलंगणा या राज्यातील विविध गावांमधून, शहरांमधून जवळपास साडेतीनशे कारभारी दैव पंच आणि समाज प्रमुख यांची उपस्थिती लाभली. हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी तुकाराम  अंजिखाने, आप्पा पंगुडवाले, बाबू औरंगे, राजू दहीहंडे, मल्लिकार्जुन परळकर, दत्तात्रय खंडेराव, किरण रानसर्जे, उदय मिसाळ ( पंढरपूर) यांनी परिश्रम घेतले.

Tags: गवळी समाजगवळी समाज अधिवेशनसोलापूर बातमी
SendShareTweetSend
Previous Post

देवेंद्र कोठेंकडून विधानसभेची मोर्चेबांधणी जोरात ; जनतेची महासेवा ठरतेय चर्चेचा विषय

Next Post

मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत चंद्रकांत पाटलांचे चॉकलेट ; स्वागताच्या अनोख्या पद्धतीमुळे वाढला गोडवा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2003402
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group