महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अभिषेक सतीश रंपुरे यांची निवड करण्यात आली आहे.
आज मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे व नेते दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक सतीश रंपुरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र रंपुरे यांना अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
या निवडीबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, जिल्हा उपाध्यक्ष अमर कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.



















