सोलापूर : भाजपचे प्रदेश सदस्य शहाजी पवार यांनी मार्डी येथे हुरडा पार्टी वेळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, बोरामणी विमानतळ मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे, त्या बदल्यात आता नान्नज, मार्डी व बाणेगावच्या माळरानावर विमानतळ करा, एमआयडीसी उभी करा, कारण आमच्या कसत असलेल्या जमिनी या वन विभागाने अधिग्रहित केल्या आहेत. ज्या माळढोक साठी तसेच वन्यप्राण्यांसाठी अधिग्रहित आहेत त्याठिकाणी एकही वन्यजीव दिसत नाही, माळढोक पक्षी तर पहायला मिळत नाही. म्हणून विमानतळ करा अशी मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली. नक्की


















