सोलापूर : समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर अध्यक्षीय मंडळ आणि कार्यकारीणीची सभा शनिवारी डाक बंगला येथे जीओसी अण्णासाहेब भालंशकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रारंभी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन अहवाल सादर करण्यात आला.
यावेळी सिनीयर जी ओ सी म्हणून अण्णासाहेब भालशंकर, सचिवपदी अनिल जगझाप व कुणाल जानराव, खजिनदारपदी सुनिल डांगे, ज्युनियर जीओसीपदी सुनिता गायकवाड (दक्षिण), विजयकुमार कांबळे (उत्तर), दत्तात्रय सिद्धगणेश ( पूर्व विभाग ), प्रकाश घटकांबळे (पश्चिम विभाग), प्रसिद्धी विभागप्रमुखपदी आनंद शिंदे व प्राचार्य वसिष्ठ सोनकांबळे यांची तर सुनिल डांगे यांची खजिनदार पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अण्णासाहेब भालशंकर यांची निवड तिसऱ्यांदा झाली आहे.
या सभेला अंगद जेटीठोर, विठ्ठल थोरे, सी डी खरात, शहाजीराव भोसले, प्राचार्य वशिष्ठ सोनकांबळे, अरुण गायकवाड, अनिल जगझाप, महादेव सुरवसे, रत्नदीप कांबळे, पुंडलिक काकडे, दत्तात्रय सिदगनेस, कुणाल जानराव, विनोद जाधव, विक्रांत दुपारगुडे, सुमित्रा जाधव, सुचित्रा थोरे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी कुणाल जानराव यांनी सर्वांचे आभार मानले.


















