सोलापूर : संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच औचित्य साधून एकता मित्र मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही एम्प्लॉयमेंट चौक परिसरात प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली होती दरम्यान माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात प्रतिमा पूजन करण्यात आलं. यावेळी माजी महापौर अलका राठोड, माजी नगरसेविका मेनका राठोड, शैलेजा राठोड, तसंच शिवराज राठोड, प्रेमसिंग राठोड , मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जॉन फुलारे, बाबुदेवराव चव्हाण, निर्मलसिंग राठोड, संजय पवार, शंकु चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी महापौर अलका राठोड, माजी नगरसेविका शैलजा राठोड, मेनका राठोड आदिनी एकता मित्र मंडळाच्या कार्य पद्धतीचं कौतुक करताना श्रीदेवी फुलारे आणि जॉन फुलारे यांनी नेहमीच विविध जाती धर्मातील घटकाला जोडण्याचं महत्वाच काम केलं आहे त्यांच्या सण उत्सवात फुलारे दाम्पत्याचा कायम पुढाकार राहिला आहे असे गौरोदगार काढतांना संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या.
माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे तसंच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जॉन फुलारे यांनी जयंती उत्सवानिमित्त शुभेच्छा देताना संत सेवालाल महाराजांच्या कार्याला उजाळा दिला
यावेळी धनराज पवार , युवराज पवार , सोहन पवार , दीपू पवार, दिनेश पवार, सूरज पवार, रोहित पवार , विक्रांत पवार , बॉबी पवार , रोहन पवार, कुमार जाधव, एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रनिल गुळेकर , अक्षय आनंद, जावेद सय्यद , महेश टंगाळे यांच्यासह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















