सोलापूर : सोलापुरात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अभूतपूर्व वातावरणात साजरी झाली. सर्वत्र जल्लोषपूर्ण मिरवणुका निघाल्या. या मिरवणुकीत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले. एका मंडळाच्या समोर लावण्यात आलेल्या ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गीतावर भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक सुनील कामाठी यांनी राष्ट्रवादीच्या गीतावर चांगलाच ठेका धरला, हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय..



















