Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! सोलापूर महापालिकेचे 1075 कोटीचे अंदाजपत्रक सादर ; करामध्ये दिली अशी सूट ; नव्या संकल्पना काय आहेत वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 February 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


 


सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शीतल तेली उगले यांनी आपले बजेट स्थायी समितीला सुमारे 1075या कोटीचे प्रशासकीय बजेट गुरुवारी पत्रकारांसमोर सादर केले यामध्ये सोलापूर महानगर पालिकेला विविध बाबींनी पासून मिळणारे उत्पन्न 677 कोटी 27 लाख 47 हजार एवढे दाखवण्यात आले आहे तर भांडवली कामांसाठी उपलब्ध होणारी रक्कम 70 कोटी 48 लाख इतकी दाखवण्यात आली आहे.


तसेच या बजेटमध्ये केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान 324 कोटी 94 लाख इतके दाखवण्यात आले आहे. 


महापालिका आयुक्तांनी आपल्या बजेटमध्ये कोणते ठळक मुद्दे मांडले आहेत पहा ते खालील प्रमाणे



करापासून उत्पन्न :


सोलापूर शहर परिसर पर्जन्यछायेचा व दुष्काळी भाग आहे. येथील शरासरी पर्जन्यमान्य ५४५ मि.मी. इतके आहे. तसेच सोलापूर शहरास उजनीतून पाणीपुरवठा हा साधारणतः १०० कि.मी. लांबीच्या पाईपलाईन मधून होतो. मालमत्ता कर विभागाकडून शहर व हदवाट विभागातील मिळकतदारांना


खालील प्रमाणे मिळकत करामध्ये सवलत दिली जाते.


● बिल दिल्यापासून १५ दिवसाचे आत रक्कम भरल्यास ५% डिजीटल मोड मध्ये रक्कम भरल्यास १% असे एकूण ६% सवलत देण्यात येते.


• ज्या मिळकतदाराकडे रेनवॉटर हार्वेस्टींग सिस्टीम आहे त्यांना २% व सोलर सिस्टीम बसविले असेल तर ५% मिळकत करामध्ये सुट देण्यात येते.


• अक्कलकोट रोड एम. आय. डि.सी. व होटगी रोड औद्योगिक वसाहतीतील सर्व मिळकतदाराना व शहर व हथवाद भागातील यंत्रमागधारकांना मुदतीत मिळकत कर भरल्यास २५% सवलत देण्यात येते.


● माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांना मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये १००% सवलत देण्यात येते.


• दिव्यांग मिळकतदारांना त्यांच्या मिळकतकराच्या ५०% अथवा कमाल रु.५०००/- सवलत दिली जाते.


शहरातील मालमत्तांच्या बाबतीत ज्या त्या भागांनुसार भांडवली मुल्यवर्धित कर लागू करण्याचे प्रस्तावीत आहे. यामुळे मिळकत करामध्ये समानता येऊन कर आकारणीमध्ये सुसूत्रता व पारदर्शकता निर्माण होणार आहे.


NCAP (राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम) राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम अंतर्गत हवेतील प्रदूषण कमी करणे व हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्यत्न करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी महानगरपालिकेने शहरातील १० मुख्य वर्दळीच्या ठिकाणी धूळ नियंत्रित करण्यासाठी पाण्याचे कारजे तयार करणे. १० ठिकाणी नागरीकांसाठी हरीत पट्टा तयार करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणेचे प्रमाण कमी करणेकामी ती जागा विकसित करून तेथे नागरीकाना बसण्याठी जागा विकसित करणे, २१ ठिकाणचे डिव्हायडरची उंची वाढविणे, कलर करणे व सुशोभिकरणाची झाडे लावणे, शहराच्या एन्ट्री पॉइंटच्या ठिकाणी पुना नाका येथे व्हर्टिकल गार्डन तयार करणे, तेथील आयलंड सुशोभिकरण करणे, याबाबत आराखडा तयार करण्यात आलेला आहे. तसेच शहरातील ८ प्रमुख


वर्दळीच्या रस्ते धुळमुक्त करणेचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सदरच्या कामामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक साधनांचा वापर करण्यात येणार आहे.


घनकचरा व्यवस्थापन विभाग


• सोलापूर महानगरपालिकेने १९० घंटागाड्यासह सर्व वार्डामध्ये ५ प्रकारात म्हणजे ओला, सुका, घरगुती घातक घरगुती सॅनीटरी आणि ई कचरा असे स्त्रोत पासूनच वर्गीकरण केले जात आहे.


• सोलापूर शहरातील मृत जनावरे यांचे दहन करणेकामी विद्युत दाहिनी प्रकल्प उभे करण्याचे काम करण्यात येत आहे. शहरातील वाढत्या कचन्याचे प्रमाण आणि वाहतुकिचे खर्च कमी करण्याकरीता नव्याने अधिकचे २ ट्रान्स्फर स्टेशन उभे करण्यात येणार आहे.


• सोलापूर शहरातील निर्माण होणारा बांधकाम व पाडकाम कचरा म्हणजेच C&D Waste वर प्रक्रिया व पुर्नवापर करणे करीता १५० टन प्रति दिन क्षमतेचे CSD Waste प्रकल्प उभारण्याचे करारपत्र करण्यात आलेले असून काम सुरु करण्यात आलेले आहे.


• बायोमायनिंग प्रकल्प सोलापूर शहरातील संकलन केलेले कचऱ्याचे वाहतुक करणे व प्रदुषणमुक्त करण्यासाठी अधिकधी ६ CNG रिफ्युज कॉम्पेक्टर प्राप्त होणार आहे. सोलापूर शहरातील जुना तुळजापूर रोड येथे असणारे ५.७८ लाख टन जुन्या कचन्यावर बायोमायनिंग व्दारे प्रक्रियेचे कार्यादेश देवून काम सुरु करण्यात आले आहे.


• प्लास्टिक कचन्याबाबत जनजागृती व दंडात्मक कारवाई हाती घेऊन शहर प्लास्टीक मुक्त करण्यात येणार आहे वर्ष २०२२-२३ मध्ये र.रु. १३.५ लाख इतकी दंडात्मक वसूली ची कारवाई प्लास्टीक बाबत करण्यात आली आहे.


सुका आणि ई-कचरा संकलनाची स्वतंत्र सुविधा हस्तांतरणाच्या वेळी रुपाभवानी ट्रान्स्फर स्टेशन वर विकसीत केलेली आहे त्याच प्रमाणे इतर तीन ट्रान्स्फर स्टेशन येथेही सदर व्यवस्था उभी करण्यात येणार आहे.


• स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत निधी मंजूर प्रकल्पांची अंमलबजावणी जलद


गतीने पूर्ण करण्यात येणार आहे.


पाणीपुरवठा :


अमृत २.० मध्ये २४ x ७ मध्ये पाणीपुरवठा अंतर्गत ५३२ कोटीचे अंतर्गत पाईप


लाईन टाकणे व नवीन टाक्या बांधणे व जुन्या टाक्या पाडणे हया कामाचे DPR


मंजुरीस्तव शासनाकडे प्रस्तावित आहे.


SCADA प्रणाली अंतर्गत पाण्याचे टाकी वितरण व्यवस्थेवर यांत्रिकी मीटर व बॉल बसविणे चे काम प्रगतीपथावर असून मार्च २०२३ नंतर शहरातील पाणीपुरवठा यांत्रिकी पध्दतीने होणार असून त्या पैकी ३ टाक्याचे सुरु करणेत आले अमृत योजने अंतर्गत टाकळी व सोरेगाव, उजनी व पाकणी येथे ५०० एच.पी. चे पंप बसवून कार्यान्वित करणेत आले आहे.


अमृत योजने अंतर्गत अक्कलकोट रोड व शेळगी परिसरातील ड्रेनेज थे पाणी नाल्यातून न वाहता पाईपलाईन व्दारे देगाव STP ला सांडपाणी पोहचविण्याचे काम मार्च २०२३ अखेर पूर्ण होणार आहे.


ICCC सोलापूर महानगरपालिकेत Integrated Command and Contral Center (ICCC) तयार करण्यात येत असून, यामुळे सदर ठिकाणी CCTV based City Surveillance. GIS, शहरातील वाहतूक व्यवस्था, मलनित्सारण व पाणीपुरवठा (SCADA), Street Light, अंब्युलेन्स सेवा, घंटागाडी Tracking. आपत्कालीन सेवा. टेकर इ. करीता सोयी उपलब्ध होणार आहे.


स्मार्ट सिटी हस्तांतरीत प्रकल्प : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोलापूर शहरात झालेल्या इंदिरागांधी स्टेडियम, हुतात्मा गार्डन, होम ग्राऊंड, राणीलक्ष्मी मंड लाईट अॅन्ड साऊंड शो. पाणीपुरवठा SCADA सिस्टीम इ. प्रकल्प तयार करण्यात आलेले असून, सोलापूर महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी मनपाकडून देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे.

माहिला व बालकल्याण योजनेअंतर्गत मनपा शाळेतील इ.८वी ते ९वी च्या विद्यार्थीनीना सायकल वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुलींच्या प्रवासासाठी मोफत बस प्रवासची योजना, तसेच महिलांना व्यवसायिक / तांत्रिक प्रशिक्षणामध्ये संगणक कोर्स, ब्युटी पार्लर, फैशन डिझायनिंग, लेडीज टेलरिंग इ. चे प्रशिक्षण देण्याची योजना आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात काळे झेंडे दाखवत अंगणवाडी सेविकांचे थाळी नाद आंदोलन ; या तारखेपासून सेविका बेमुदत संपावर

Next Post

सोलापुरात भाजप नेता ही नाचतो ‘राष्ट्रवादी पुन्हा’ गाण्यावर ; व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात भाजप नेता ही नाचतो 'राष्ट्रवादी पुन्हा' गाण्यावर ; व्हिडीओ होतोय व्हायरल

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986279
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group