सोलापुरात मराठा समाजाच्या दोन नेत्यांमध्ये जुंपली ! माऊली पवार- अमोल शिंदे यांचे एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप
मराठा समाजाचा सोलापुरातील नेता मॅनेज होत नाही म्हटल्यावर त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र हे अमोल शिंदे यांच्याकडून रचले जात आहे. वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला 20 लाख रुपये दिल्याचा खोटा आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
यास प्रत्युत्तर म्हणून मी माऊली पवार या वक्तव्याचा निषेध करत तात्काळ समाजाची माफी मागा अन्यथा माझी आणि पर्यायाने समाजाची दिशाभूल करण्याचे वक्तव्य करून चळवळीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्यामुळे मानहानीचा दावा दाखल करणार आहे. अशी माहिती दिली.
दरम्यान यावर अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माऊली पवार यांनी आपल्यावर दावा ठोकावा असे उलट सांगताना मराठा समाज समन्वयक माऊली पवार यांनी काँग्रेस कडून वीस लाख रुपये घेतल्याचे माझ्याकडे जे पुरावे आहेत हे सर्व पुरावे मी न्यायालयात अथवा समाजासमोर सादर करेल अशी माहिती दिली आहे.