सोलापूर : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खोखो संघटक शरणप्पा मल्लप्पा तोरवी वय ८५ यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले व एक मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी रूपाभवानी येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
उत्कर्ष क्रीडा मंडळ आणि सोलापूर जिल्हा खोखो असोसिएशनच्या प्रचार व प्रसारात त्यांचा सिंहाचा वाटा होता. खासदार शरद पवार महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष असताना त्यांनी सरचिटणीस व कार्याध्यक्ष ही महत्वाची पदे भूषविली होती.


















