Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ड्रायव्हरनेच फोडले मालक कार्यकारी अभियंत्याचे घर ; सोलापुरात अजब चोरीची गजब कहाणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 February 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : परिस्थिती गरीब, लग्न जमत नाही यामुळे खाजगी चालकाने आपल्या मालक कार्यकारी अभियंत्याचे घर फोडून तब्बल 10 लाखाची रोकड लंपास केली होती. पोलिसांनी अखेर त्या वाहन चालकास बेड्या ठोकून चोरी उघडकीस आणली.

संतोष विजयकृष्ण कुलकर्णी यांचे जुळे सोलापूर येथे व्दारकादीश मंदिरा समोर सानवी अपार्टमेंन्ट येथे फ्लॅट आहे. तसेच सध्या ते इंद्रधनु येथील फ्लॅट मध्ये राहत आहेत. संतोष कुलकर्णी यांनी त्यांचे शेतीचे उत्त्पन्नातून मिळालेली १० लाख रूपये रोख रक्कम ही, त्यांचे सानवी अपार्टमेंन्ट येथील फ्लॅटचे बेडरूम मधील लाकडी कपाटात डिसेंबर २०२२ मध्ये विभागुन ठेवली होती. त्याठिकाणी त्यांचे तसेच त्यांचे ड्रायव्हरचे, मित्रांचे येणे जाणे होते. दिनांक ०५/०२/२०२३ रोजी संतोष कुलकर्णी यांनी, त्यांचे सानवी अपार्टमेंन्ट येथील बेडरूमचे कपाटात ठेवलेली रक्कम तपासली असता, ती त्याठिकाणी दिसून आली नाही. तसेच फ्लॅटचे कुलुप कडी कॉयडा देखील तुटल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे, त्यांचे जवळच्या माहीतगार व्यक्तीने चोरी केल्याचा त्यांना संशय आला. तेव्हा संतोष कुलकर्णी यांनी जवळच्या व्यक्तींकडे विचारणा करून देखील चोरी केलेबाबत त्यांना कोणी माहीती दिली नाही. त्यामुळे त्यांनी दि. १७/०२/२०२३ रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३८० प्रमाणे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला.

विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे वपोनि दोरगे, सपोनि संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथक यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन, सदर चोरी बाबत फिर्यादी यांचेकडुन, नमुद फ्लॅटवर येणारे फिर्यादी यांचे जवळचे इसमांची माहीती घेतली.

त्यानंतर, सपोनि संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथक यांनी या बाबत तपास सुरू केला. यातील फिर्यादी यांचे घराची माहीती असलेले, तसेच सध्या त्यांचेकडे चालक म्हणून कामास असलेल्या सर्वांकडे प्राथमीक तपास केला असता, त्यांचा खाजगी वाहन चालक नागेश ऊर्फ अमित सुर्यकांत भरडे वय ३४ वर्ष, व्यवसाय- ड्रायव्हर, राहणार घर नंबर – १३१३, उत्तर कसबा, टिळक चौक, सोलापूर याचा फोन गुन्हा दाखल झाले पासून बंद असलेला दिसून आला. त्यामुळे त्याचेवर संशय बळावला. तसेच त्याचा, त्याचे राहते घरी व आजुबाजुचे परीसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

त्यानंतर दि. १८/०२/२०२३ रोजी मिळालेल्या माहितीनुसार नागेश ऊर्फ अमित सुर्यकांत भरडे हा, संतोष कुलकर्णी यांचेकडे ड्रायव्हर म्हणून कामास असून, त्यानेच संतोष कुलकर्णी यांचे घरी चोरी केली असल्याचे समजले. तसेच नागेश भरडे हा सोलापूर सोडून जाण्याचे तयारीत आहे तो थोडया वेळात पोटफाडी चौक येथे येणार आहे अशी माहीती मिळाली होती.

त्यामुळे, प्राप्त बातमीचे अनुषंगाने पोटफाडी चौक येथे सपोनि संजय क्षिरसागर व त्यांचे पथकाने सापळा लावला असता, फिर्यादी यांचा खाजगी चालक नागेश ऊर्फ अमित सुर्यकांत भरडे हा सदर ठिकाणी आल्याने, त्यास शिताफिने ताब्यात घेतले, सदर ठिकाणी पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात नमुद गुन्हयात चोरीस गेलेले २ लाख रुपये मिळुन आले त्यानंतर त्यास आणखी विश्वासात घेऊन तपास करता त्याने सांगीतले की, त्याची परिस्थीती गरीब आहे, त्यास पगार कमी आहे, त्याचे लग्न जमत नाही म्हणुन लग्नासाठी त्याने सदर चोरी केल्याचे सांगीतले. तसेच चोरीतील ऊर्वरीत रक्कम रूपये ८ लाख हे सुध्दा त्याने काढुन दिले. अशा प्रकारे वरील प्रमाणे दाखल गुन्हयात चोरीस गेलेले १० लाख-रूपये आरोपीकडुन १२ तासात हस्तगत करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खोखो संघटक शरणप्पा तोरवी यांचे निधन

Next Post

‘समाज कल्याण’ला तंबी तर ‘कृषी’च्या कामावर 50-50 समाधान ; झेडपीत सेसच्या खर्चाचे चाललंय काय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'समाज कल्याण'ला तंबी तर 'कृषी'च्या कामावर 50-50 समाधान ; झेडपीत सेसच्या खर्चाचे चाललंय काय

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986285
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group