Wednesday, April 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

हालगीचा कडकडाटासह लेझीमचे उत्कृष्ट डाव ; सोलापुरात जेमिनी मंडळाच्या नवरात्रोत्सव मिरवणूकीने वेधले लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 October 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आई राजा उदे उदे. सदानंदीचा उदे उदे… जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, सियावर प्रभू रामचंद्र की जय, भारत माता की जय असा जयघोष, तुतारीचा गगनभेदी सूर, बँजोचा सुरमयी संगीत लहरीत, हलग्यांचा कडकडाट, लेझीमचा छनछनाटात घोंगडे वस्ती, भवानी पेठ येथील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या नवरात्र उत्सवाची मिरवणूक मंगळवारी उत्साहात काढण्यात आली.  

आकर्षक फुले आणि विद्युत रोषणाईने सजवलेला मिरवणुकीचा रथ उठावदार दिसत होता. या रथाकडे बघून सगळे हात जोडत नतमस्तक होत होते.

मिरवणुकीचा शुभारंभ महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करनकोट, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

शुभारंभप्रसंगी भाजपचे नेते चन्नवीर चिट्टे, अक्षय अंजीखाने, सागर अतनुरे, संदीप महाले, महेश जेऊरे, आप्पा शहापुरे, नरसप्पा मंदकल, बसवराज जाटगल, बंडेप्पा डोळे, सिद्धरामय्या पुराणिक, बसवराज भाईकट्टी, निंगप्पा पुजारी, सिद्राम कलशेट्टी यांच्यासह विश्वस्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी जमलेल्या देवी भक्तांनी आई राजा उदो, उदो सदानंदीचा उदे उदे, भारत माता की जय असा जल्लोष करताच मिरवणूक मार्गस्थ झाली. संपूर्ण मिरवणुकीमध्ये सुरेश पाटील हे कार्यकर्त्यांच्या आधार घेत भवानी पेठेपासून ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत मिरवणुकीबरोबर चालत राहिले. अण्णांच्या या स्थितीत चालताना बघून देवीभक्त आणि परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करत अण्णांच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छाही दिल्या. 

लेझीमधारक व मंडळाचे विश्वस्तांना एक हजाराहून अधिक ड्रेस शिवण्यात आले होते. या ड्रेसवर सगळे पदाधिकारी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते. यंदा मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकांनी भगव्या रंगाच्या टोपी परिधान केले होते. भगव्या टोपीवर जेमिनी माता, घोंगडे वस्ती असा उल्लेख होता. हे टोपी परिधान केलेले नागरिक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. जेमिनी माता, घोंगडे वस्ती उल्लेख असलेले बॅच सगळ्यांनी आपल्या छातीवर अभिमानाने लावून मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

मिरवणूक माणिक चौकात येताच भाजपचे नेते  उदयशंकर पाटील यांच्या हस्ते जेमिनी मातेची पूजा करून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी, विश्वस्त हे सिमोल्लंघनासाठी पार्क चौकाकडे मार्गस्थ झाले. पार्क चौकात सिमोल्लंघन कार्यक्रम होताच जयघोष करत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना सोने देऊन विजयीदशमी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि मिठी मारून भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. तेथील हा सोहळा संपल्यानंतर सर्व भक्तांनी सिद्धेश्वर मंदिरात दाखल होऊन तेथे धोत्रीकर वस्ती येथील समर्थ मित्र मंडळाने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. नवरात्रोत्सव कालावधीमध्ये सिद्धराज येलदड्डी, अंबादास कोळी, नागनाथ मंदकल, अंबादास काडगुड्डा यांनी पूजा-विधीबरोबरच व्यवस्था पाहिली. 

या मिरवणुकीसाठी सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे युवा नेते बिपीन पाटील, उत्सवाचे अध्यक्ष अप्पी पुजारी, पवन तगारे, नवीन गोटीमुक्कुल, व्यंकटेश जाटगल, नागराज डबरे, विजय कोळी, बसलिंगप्पा करली, रवी मंदकल, अक्षय कलशेट्टी, गणेश मल्लुरे, प्रभू पुजारी, प्रशांत गाडेकर, सिद्राम मंदकल, प्रवीण डोळ्ळे, कुमार शिरशीकर, मल्लू कोळी, महेश शिंदे, अनिल पारट, आनंद मासरेड्डी, शरणू मुडल, सिद्राम हळ्ळी, रेवन वग्गुर, सिद्राम शेकसंधी, प्रवीण कैरमकोंडा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

माजी आमदार दिलीप माने यांनी केले पार्क चौपाटीवर स्वच्छतेचे सिम्मोलंगण!

Next Post

सोलापूरच्या मातीचे अमृतकलश वाजतगाजत दिल्लीकडे रवाना ; जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या मातीचे अमृतकलश वाजतगाजत दिल्लीकडे रवाना ; जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1978707
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group