सोलापूर शहरात मागील काही दिवसांपासून पोलीस प्रशासन प्रमाणाच्या बाहेर सक्त झाल्याचे पाहायला मिळते. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या शासकीय कॅमेरामनला पोलिसांनी उचलून बाहेर ढकलले. त्याची तक्रार पत्रकारांनी केली होती. त्यानंतर प्रादेशिक वहिनीच्या पत्रकारांशी पोलीस शिपायाने हुज्जत घालून शिवीगाळ केली होती.
एकीकडे माध्यमाच्या प्रतिनिधींसोबत पोलीस प्रशासन असे वागत असताना दुसरीकडे सत्तेतील आमदारांच्या ‘पीए’ला पोलीस प्रशासनाने अतिशय वाईट वागणूक दिली. राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत नियोजन भवनात गेले असता त्यांच्यामागे दुसऱ्या गाडीत आलेले यांचे पीए किरण पोतदार हे आत जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. अहो मी सुभाष देशमुख यांचा पीए आहे असे वारंवार ते सांगत होते मात्र त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यांनी आपले ओळखपत्र ही दाखवले तरीही पोलिसांनी सोडले नाही.
सरकारी अधिकाऱ्यांना आत प्रवेश आहे तुम्हाला नाही खाली थांबा असे म्हणून त्यांना खाली पाठवले. दरम्यान त्यांनी कुणाला तरी फोन लावून दिला तेव्हा आत जाण्यास सांगितले मात्र यावेळेस नक्की काय झाले की पुन्हा पोलिसांनी त्यांना हात पकडून खाली ढकलले. याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आले असता पोतदार यांनी पुन्हा फोन लावून दिला तेव्हा पायऱ्यावर थांबलेला पोलीस अधिकारी खाली आला तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून पहिले या दोघांची माफी मागा तरच आत सोडतो असे सांगून वाईट वागणूक दिली. किरण पोतदार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असे प्रथमच झाले यापूर्वी अशी वागणूक मिळाली नाही.



















