Monday, October 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात रमजान ईदचा सर्वत्र उत्साह ; मशिदीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, नमाज सोबत आता शिक्षण ही द्या , या वस्तू बॉयकॉट करा 

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 April 2024
in Social
0
सोलापुरात रमजान ईदचा सर्वत्र उत्साह ; मशिदीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, नमाज सोबत आता शिक्षण ही द्या , या वस्तू बॉयकॉट करा 
0
SHARES
409
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात रमजान ईदचा सर्वत्र उत्साह ; मशिदीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, नमाज सोबत आता शिक्षण ही द्या, या वस्तू बॉयकॉट करा

सोलापूर :  महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर गुरुवारी सोलापूर शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र ( रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी होत आहे. सकाळी नमाज पठणानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्यार्चा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरूवात केली आहे. सकाळी शहरातील होटगी रोड वरील प्रमुख ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली.

काल बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ईद का चाँद मुबारक म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करून शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी गुरुवारी रमजान ईद साजरी करण्यात येईल असे सांगितले होते.  ईदच्या दिवशी सकाळी सर्व मशिदी व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजसाठी एकत्र आले होते  आलमगीर ईदगाह (होटगी रोड) या ऐतिहासिक शाही ईदगाहवर सकाळी 9 वाजता सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली.

देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सवार्ना खऱ्या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली.

दरम्यान उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांना संबोधित करताना शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी, मुस्लिम समाजाच्या मशीदीकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बदलला पाहिजे, मशीद म्हटले की त्यावरील भोंगा दिसतो परंतु या मशिदीत असलेल्या रिकाम्या जागेत आपल्या भागातील मुलांना शिक्षण द्या, रिटायर्ड टीचर, बेरोजगार युवकांना शिक्षण देण्याचे काम द्या त्यामुळे मशिदीतून आता केवळ नमाज नाही तर चांगले इंग्रजी, विज्ञान शिकून वैज्ञानिक, इंजिनियर, डॉक्टर मुले बाहेर पडतील असे आवाहन शहर काझी यांनी केले.

इस्राईल कडून पॅलेस्टीनीवर होत असलेल्या हल्ल्याचा यावेळी शहर काझी यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आज जगातील मुसलमान सीमा भागात विखुरला गेला आहे. त्यामुळेच असे इस्राईल आणि अमेरिका हे असे देश अन्याय करत आहेत. त्यामुळे आपसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. यावर आता एकच पर्याय तो म्हणजे इस्राईल आणि अमेरिकेच्या वस्तूंना बायकॉट करा, त्या देशाच्या वस्तू वापरू नका, आपल्या देशातील वस्तू वापरून आपली अर्थव्यवस्था मजबूत करा असे आवाहनही शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी केले.

Tags: Ahamad Ali kaziRamdan idSolapur News
SendShareTweetSend
Previous Post

नाना पटोले यांचा अपघात नसून घातपात ; तात्काळ वाय प्लस सुरक्षा पुरवा – प्रा कुलकर्णी

Next Post

महादेव कोगनूरे यांचे मुलाला आतापासूनच सामाजिक कार्याचे धडे ; चिरंजीव लक्ष्मीकांतचा वाढदिवस अनाथांसोबत साजरा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002007
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group