Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सहाय्यकांना सीईओ स्वामी यांनी दिल्या संवाद कौशल्याच्या टिप्स ; काय दिला सल्ला वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 June 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी व तत्परतेने सेवा देणेरिता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा ग्रामीण जनतेशी सुसंवाद वाढण्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सहाय्यिका यांचे संवाद कौशल्य व व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या  यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत सध्याचे ताणतणाव व संवाद कौशल्यावर आधारित विषयांवर मार्गदर्शन केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन  करण्यात आले. धन्वंतरी पूजनानंतर धन्वंतरी स्तवनाचे गायन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यशाळेस सुरूवात करण्यात आली.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सीईओ स्वामी म्हणाले, या उपक्रमासाठी शासनस्तरावरून किंवा वरिष्ठ स्तरावरून आदेश नाहीत तरी  आपल्या जिल्ह्यातील आरोग्य सेवा दर्जेदार व्हावी, तत्परतेने रुग्णांस निस्वार्थी भावनेने सेवा देणेकरिता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुसंवाद वाढावा यासाठी  हा  एक प्रयत्न. आरोग्य सेवा देताना रुग्णांच्या भावनांना प्रतिसाद  द्या, त्यांचे ऐकून घ्या. ग्रामस्थ आणि तुमच्यातील सुसंवाद वाढला तर विश्वास निर्माण होईल. आपले शासकीय कर्तव्य पार पाडताना स्वतःकडे व स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सशक्त शरीरात एक सशक्त मन राहतं आणि सशक्त मनाने तुम्ही येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाल. जनतेबरोबरच, आपले सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही सुसंवाद वाढावा. आरोग्य सेवेविषयी ज्या काही तक्रारी प्राप्त होतात ,त्यातील बहुतेक तक्रारी विसंवादामुळेच निर्माण झाल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. जे आवश्यक आहे तेवढंच बोला, बोलण्याची पद्धत साधी व सौम्य ठेवा. 

 येणाऱ्या आषाढी वारीमध्ये महिला वारक-यांची संख्या अधिकची असण्याची शक्यता असल्याने त्यांना निसंकोचपणे शुश्रूषा सेवा मिळावी म्हणून या वर्षी महिला वारकर्यांकरिता महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा देण्यात येणार आहेत. येणाऱ्या वारीमध्ये वारकऱ्यांना आरोग्य सेवा देताना विठ्ठलाची सेवा करण्याचे भाग्य आपणांस मिळाले आहे या भावनेतून काम करा, याकडे काम म्हणून न पाहता सेवा म्हणून पहा. स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी व कर्तव्य म्हणून काम करत रहा, म्हणजे कामाचे ओझे वाटणार नाही. ते पुढे म्हणाले की प्रत्येक युगात स्त्री शक्तीला एक मानाचे स्थान आहे. स्त्री जन्माचे स्वागत, माता मृत्यू बाल मृत्यू रोखणेकरिता आपले प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध  कार्यक्रमाबरोबर आपली वाणी प्रेमळ ठेवावी. संवाद कौशल्य व व्यक्तीमत्व विकास या विषयावर बोलताना व्याख्याते डॉ.अतिश बोराडे यांनी आरोग्य सहाय्यिकांचे दैनदिन जीवनातील ताणतणाव दूर करणेबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे म्हणाले की, आरोग्य सहाय्यिकांचा जॉब चार्ट पाहिला तर असे जाणवले की समाजात या संवर्गाला फार मोठी सेवा करण्याची संधी मिळाली आहे. विविध जाती-धर्म, मानसिकता, डोक्यात वेगवेगळे समज गैरसमज, श्रद्धा-अंधश्रद्धा डोक्यात घेऊन आलेल्या मंडळींना तुम्हाला सामोरे जावे लागते. या सर्वांशी सुसंवाद साधनं म्हणजे दिव्य आहे. यासाठी  ध्यानधारणा व व्यायामाकडे लक्ष द्या. यासाठी स्वतःशीच अगोदर संवाद साधा. स्वतःशी संवाद साधता आला तरच तुम्ही इतरांशी संवाद साधू शकता. आरोग्य सहाय्यिकांचे महत्वाचे काम म्हणजे उपकेंद्र स्तरावरील आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात दुवा साधणे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांना समजून घेवून त्यांना आरोग्य सेवेविषयी मार्गदर्शन करणे. महत्वाचे म्हणजे मुलींच्या जन्माचा टक्का न वाढण्यामागे लोकांशी संवाद साधण्यात आपण कमी पडतो हेच कारण आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षमीकरण, सादरीकरण व बौद्धिक खेळ यावर जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे यांनी केले .याप्रसंगी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते, तर सुत्रसंचलन डॉ विलास सरवदे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ. संगीता सोनवणे यांनी मानले.

SendShareTweetSend
Previous Post

आता ‘Google Mapping’ने होणार जिल्ह्यातील दलित वस्त्यांचा विकास ; अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची नवी संकल्पना ; Solapur

Next Post

जिल्ह्यातील शिरापूर व मांडवे ग्रामपंचायतीचा ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या हस्ते झाला सन्मान ; वाचा कशासाठी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्ह्यातील शिरापूर व मांडवे ग्रामपंचायतीचा ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या हस्ते झाला सन्मान ; वाचा कशासाठी

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996480
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group