Sunday, July 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

*सोलापूर जिल्ह्याचा वार्षिक 15 हजार 550 कोटीच्या वित्तपुरवठा आराखडा जाहीर, या क्षेत्राला राहणार सर्वाधिक प्राधान्य*

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 July 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. 13 (जिमाका):-जिल्हा वार्षिक पतपुरवठा धोरण 2023-24 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण 15 हजार 550 कोटीचा पतपुरवठा आराखडा जाहीर करण्यात येत आहे. या अंतर्गत प्राधान्य क्षेत्राला दहा हजार पाचशे पन्नास कोटी पतपुरवठा करण्यात येणार असून कृषी क्षेत्राला 7 हजार 250 कोटी रुपये पतपुरवठा करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील बँकांना देण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांनी कृषी क्षेत्रा सह दिलेल्या उद्दिष्टप्रमाणे सर्व क्षेत्राना पत  पुरवठा केला पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या (DLCC) त्रैमासिक बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी आरबीआयचे डीएलओ राहुल कुमार, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री, नाबार्डचे जिल्हा समन्वयक नितीन शेळके, जिल्हा बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, आरसिटी चे संचालक दीपक वाडेवाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते यांच्यासह सर्व बँकांचे संबंधित प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, पीक कर्जाच्या अनुषंगाने लहान लहान शेतकऱ्यांना बँकांकडून पिक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते अशा तक्रारी प्रशासनाला प्राप्त होत असतात. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांनी पीक कर्ज मागणीसाठी येणारा लहानात लहान व गरजू शेतकऱ्याला तात्काळ पिक कर्ज पुरवठा केला पाहिजे. पतधोणातील उद्दिष्ट प्रमाणे संख्यात्मक उद्दिष्ट पूर्ण न करता लहानात लहान शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत योग्य ती दक्षता बँकांकडून घेण्यात यावी असेही निर्देश त्यांनी दिले.

मागील वर्षीच्या जिल्हा वार्षिक पद धोरणानुसार सर्व बँकांनी गृह कर्ज व शैक्षणिक कर्ज वगळता दिलेले उद्दिष्ट साध्य केल्याचे दिसून येते. परंतु बँकांनी शैक्षणिक कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बँकांकडे शैक्षणिक कर्ज मागण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सर्व विहित नियमावलीची माहिती देऊन ती त्यांच्याकडून पूर्ण करून अशी प्रकरणे मंजूर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. त्याप्रमाणेच बँकांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनाच्या प्रकरणात विहित पद्धतीने परंतु वेळेवर कर्ज पुरवठा करावा असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यातील सर्व महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांनी शासनाकडून त्यांना आलेल्या उद्दिष्ट प्रमाणे संबंधित लाभार्थ्याकडून परिपूर्ण अर्ज भरून घेऊन कर्ज मागणीचे प्रस्ताव बँकाकडे पाठवावेत. बँकांनी विहित पद्धतीने व परिपूर्ण असलेले प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत. तसेच जे प्रस्ताव मंजूर करण्यासारखे नाहीत ते प्रस्ताव तात्काळ कारणासह नामंजूर करून संबंधित महामंडळांना कळवावे. व महामंडळांनी त्यातील त्रुटी दूर करून ते प्रस्ताव पुन्हा बँकाकडे सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नाशिककर यांनी जिल्हा वार्षिक पद धोरण 2022 23 अंतर्गत देण्यात आलेले 8 हजार 80 कोटीचे वित्तपुरवठाचे उद्दिष्ट हे 8 हजार 260 कोटी वित्तपुरवठा करून पूर्ण करण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली. 102% उद्दिष्ट पूर्तता झालेली असून यावर्षी पंधरा हजार पाचशे पन्नास कोटीचे वित्त पुरवठा करण्याचे बँकांना उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मागील वर्षी पीक कर्ज 103%, कृषी 133%, गृह कर्ज 80 टक्के व शैक्षणिक कर्ज 27 टक्के वाटप करण्यात आलेले आहे. तर जिल्ह्यातील बँकांनी बचत गटांना 280 कोटीचे कर्ज वाटप केले असून ते उद्दिष्टापेक्षा खूप अधिक असल्याचे सांगितले. तसेच प्राधान्य क्षेत्राला 139 टक्के कर्ज वाटप झाल्याची माहिती ही श्री. नाशिककर यांनी यावेळी दिली. तर यावर्षीच्या वार्षिक पत धोरण आराखड्यानुसार 2 हजार 379 कोटी खरीप तर 1 हजार 871 रब्बी पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे.  कृषी मुदत कर्जासाठी 3 हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. प्राधान्य क्षेत्राला 10 हजार 550 कोटी तर अप्राधान्य क्षेत्राला 5 हजार कोटी असे एकूण 15 हजार 550 कोटीचा वार्षिक पत पुरवठा आराखडा पुण्याचे श्री. नाशिककर यांनी सांगितले. यावेळी आरसिटी चे संचालक दीपक वाडेवाले यांनी आरसिटी मार्फत वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती बैठकीत सादर केली.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक पतपुरवठा धोरण पुस्तिका व आरसिटी वार्षिक अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

                     **********

SendShareTweetSend
Previous Post

सुरत चैनई एक्सप्रेसच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; प्रस्तावाच्या त्रुटी पूर्ततेसाठी आता प्रशासन….

Next Post

सिईओ दिलीप स्वामी यांच्या नाराजीने अधिकारी धास्तावले..! काय आहे “ कृती कार्यक्रम ९० दिवस “

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सिईओ दिलीप स्वामी यांच्या नाराजीने अधिकारी धास्तावले..! काय आहे “ कृती कार्यक्रम ९० दिवस “

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986550
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group