Friday, June 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : ग्रामसेवकाला हाताशी धरून सरपंच पुत्राने स्वतः नावे काढले लाखों रुपये? उपसरपंचाची सीईओकडे तक्रार ; कोणत्या गावातील प्रकार वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री या गावात सरपंच पुत्राने ग्रामसेवकाशी संगनमत करून शासनाचे लाखो रुपये परस्पर काढून भ्रष्टाचार केल्याची तक्रार गावच्या उपसरपंच यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

धोत्री गावच्या उपसरपंच महानंदा मल्लप्पा चौगुले,बसवराज शरणप्पा पाटील,मडोळप्पा शंकर दहिटणे यांनी जिल्हा परिषदेचे पक्षनेते अण्णाराव बाराचारे यांच्या उपस्थितीत बुधवारी सीईओ स्वामी यांना निवेदन दिले.

निवेदनात चौगुले यांनी म्हंटलंय, मौजे धोत्री, ता. दक्षिण सोलापूर येथील सरपंच शांताबाई नारायण व्हटकर यांचा मुलगा प्रभाकर नारायण व्हटकर व ग्रामसेवक आय.बी. भोज यांनी लाखो रुपयाचे भ्रष्टाचार निदर्शनास आल्याने आपणांकडे दिनांक ९/९/२०२१ व दिनांक १५/११/२०२१ रोजी तसेच गटविकास अधिकारी  (वर्ग-१), पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांना दिनांक ०९/०९/२०२१ रोजी याबाबतचे लेखी तक्रार निवेदन सादर केलेले आहेत. परंतु आपणांकडून व गटविकास अधिकारी  (वर्ग-१), पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांच्याकडून माझ्या अर्जाची कोणतीही दखल न घेण्यात आलेली नसून आजतागायत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही.

धोत्री येथील १) मातंग वस्ती समाज मंदिर बांधकाम, २) आंबेडकर वस्ती शाळा वॉल कंपाऊंड करणे, ३) आंबेडकर वस्ती शाळामध्ये बोअर मारणे, ४) मातंग वस्ती मध्ये बंदिस्त गटार करणे, ५) भिमनगर मधील 8) समाज मंदिर दुरुस्ती, ६) ढोर गल्ली मध्ये बंदिस्त गटार, ७) जलजन्य योजने अंतर्गत गांव अंतर्गत नळ कनेक्शन जोडणी, ८) भिमनगर मधील पिण्याच्या पाण्याचे विहिर दुरुस्ती व खोलीकरण, ९) अपंग निधी, १०) महिला बाल कल्याण निधी असलेली सर्व कामे १४वा व १५वा वित्त आयोगामधुन मंजूर करण्यात आलेली आहेत. परंतु नमूद कोणतीही कामे न करता ग्रामसेवक आय.बी. भोज व सरपंच शांताबाई नारायण व्हटकर यांचा पुत्र प्रभाकर नारायण व्हटकर यांच्या दोघांच्या संगनमताने लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच  आय.बी. भोज व सरपंच श्रीमती. शांताबाई नारायण व्हटकर या दोघांनी संगनमत करुन पदाचा गैरवापकरुन लाखो रुपयांचे चेक दिलेले आहेत.

आय.बी. भोज व सरपंच श्रीमती. शांताबाई नारायण व्हटकर या दोघांनी संगनमत करुन पदाचा गैरवापर करुन वरीलप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच मुलगा, सरपंच मुलगा याचा सहकारी व रोजगार सेवक यांच्या नावाने बेकायदेशीर धनादेश काढून लाखो रुपयाचा मोठा गैरव्यवहार व भ्रष्टाचार केले आहे. याबाबत आपण आपल्या स्तरावरुन चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचारा झाल्याचे निदर्शनास / उघडकीस येईल.

तसेच वरील सर्व कामे बांधकाम व पाणी पुवठयाचे खात्याचे जी.ए. श्री. बिराजदार यांनी कोणत्याही कामाचे एम.बी. केलेली नसताना बोगस कामे दाखवून बिले काढलेली आहेत. वरील सर्व कामांची वरील नमूद व्यक्तीच्या नावाने सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमतानी लाखो रुपयाचे चेक काढलेले आहेत.

तरी मौजे धोत्री, ता.दक्षिण सोलापूर येथील पाणी, आरोग्य व विद्युत हे दैनंदिनी जिवनावश्यक कामे सोडून बांधकाम, पाणी पुरवठा व इतर योजनांची सर्व कामांना स्थगिती मिळावी.

सदर कामांची लवकरात लवकर चौकशी न झाल्यास मौजे धोत्री, ता. दक्षिण सोलापूर च्या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्तांच्या वतीने आंदोलन / उपोषण करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आंदोलन करणाऱ्या आडम मास्तरसह शेकडो कार्यकर्ते अटक

Next Post

धक्कादायक : पत्रकार खलील शहानूरकर यांचे निधन ; युवा पत्रकार गेला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धक्कादायक : पत्रकार खलील शहानूरकर यांचे निधन ; युवा पत्रकार गेला

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986174
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group