Sunday, November 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : काँग्रेसच्या बसवराज बगलेंनी व्यक्त केली मनातील खंत ; म्हणाले, दक्षिण सोलापूरच्या भूमिकेवर ठामच

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : – युवक काँग्रेसच्या मुदतपूर्व  नेमणूका जाहीर करतांना दक्षिण सोलापूर मतदार संघातील सर्वांना विश्वासात घेऊन,राजकीय समिकरणांचा अभ्यास करून,सामुदायिक निर्णय झाला असता तर 12 डिसेंबर पर्यंत युवकांची सभासद नोंदणी आणखी वाढली असती,अशी सकारात्मक भूमिका जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी प्रवक्ते डाॅ.बसवराज बगले यांनी मांडली.

दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष निवडताना ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी संपूर्ण तालुक्यातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांना बोलावून ईच्छुकांसह सर्वांची मते जाणून घेतली होती.त्यांना सर्वाधिकार दिल्यानंतरच तालुका अध्यक्षांची नियुक्ती केली होती.याचीही आठवण डाॅ.बगले यांनी करून दिली.

 युवक काँग्रेसच्या सभासद नोंदणीत हस्तक्षेप करून अचानक मुदतपूर्व नांवे जाहीर केल्याने वादंग निर्माण झाला असून त्याबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर बगले यांनी आपली भूमिका  मांडली. ते पुढे म्हणाले की,ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून संपूर्ण जिल्हा मला गेल्या 31वर्षापासून ओळखतो. मी जिल्हा किंवा तालुक्याचा सोडाच पण माझ्या गावचा सुध्दा नेता नाही.पण पक्षासाठी माझे योगदान काय आहे याची माहिती दक्षिण सोलापूरला आणि सुशीलकुमार शिंदे यांना आहेच.कारण 1990 साली म्हणजेच 31 वर्षापूर्वी मी एन.एस.यु.आय.या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा तालुका अध्यक्ष होतो.त्यानंतर युवक संघटनेचा तालुका अध्यक्ष व युवक काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस म्हणून जिल्हा स्तरीय युवकांचे संघटनकौशल्य हाताळण्याचे काम 25 वर्षापूर्वीच केले आहे.त्यानंतर आज तालुका आणि जिल्हा काँग्रेसचे काम निष्ठापूर्वक करत आहे.केवळ मला राजकीय वारसा नसल्यामुळेच पक्षांकडून माझ्यावर अन्याय झाला.अशी खंत त्यांनी व्यक्त केली.म्हणूनच 2011 साली राष्ट्रवादीत प्रवेश केला.राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी माझे संघटन कौशल्य पाहून सलग 9 वर्षे तालुका अध्यक्षपदाची संधी दिली.संपूर्ण जिल्ह्यांने माझी कार्यशैली अनुभवली आहे.असेही ते म्हणाले. 

दरम्यान 2017 साली सोलापूर शहरातील विजापूर रोड भागातून महानगरपालिकेची निवडणूक लढविली.राष्ट्रवादीत जाण्याचे कारण मी जाहीर केले तर पक्षाची खूप मोठी हानी होईल.म्हणून मी संयम राखतो,असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत नेतृत्वाकडून समन्वय न घडल्याने अनेक दिग्गज मंडळी काँग्रेसमधून बाहेर पडली.तालुका नेतृत्वहिन झाल्याने उमेदवार एकटाच फिरत होता.त्याला कुणी ओळखतही नव्हते.तेव्हा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मी पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.दुसर्याच दिवसांपासून निवडणूक खांदयावर  घेतली.ईतर सर्व ज्येष्ठ मंडळीना पटवून सांगून निवडणुकीत कॉंग्रेसचा झंझावात निर्माण केला.हे अख्या तालुक्याला माहिती आहेच. 

● *वादाचा मुद्दा दक्षिण सोलापूरचा…!* 

————-

युवक काँग्रेसच्या वादाबद्दल छेडले असता डाॅ.बसवराज बगले म्हणाले की,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या घटनेतील तरतुदी प्रमाणे लोकशाही मार्गाने युवकांची सभासद नोंदणी आणि मतदान प्रक्रिया 12 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.पक्षात युवकांची संख्या वाढावी हा पक्षाचा मुख्य हेतू आहे.

सोलापूर शहरात,शहर मध्य आणि शहर उत्तर मतदार संघात कुणी काय निर्णय घ्यायचा त्याबाबत बोलण्याचा माझा काहीच संबंध नाही,त्याबद्दल मी कुठेही जाहीरपणे बोललोही नाही.दक्षिण मतदार संघातील चारही युवक उमेदवारांच्या संपर्कात राहून सभासद नोंदणी व मतदानाचा पाठपुरावा दररोज करत असतांना अचानकच आमदार कु.प्रणितीताई यांनी एकतर्फी  उमेदवारी जाहीर करून टाकली.त्यामुळे मतदार संघातील राजकीय समीकरण बिघडले.एका युवक उमेदवारांने धनगर समाजावर काँग्रेसकडून नेहमीच अन्याय होत असल्याचा राग व्यक्त केला,पंरतु यासंबंधी प्रदेश नेतृत्वाला विचारण्याची  पात्रता आमची नाहीच.केवळ ‘ वयाने मोठा आणि अनुभवाने प्रगल्भ ‘ असल्यामुळेच पक्षशिस्त पाळून खाजगीत प्रदेश निरीक्षकांशी याबाबत चर्चा केली.माध्यम प्रतिनिधीने याचे प्रसिद्धीकरण केले,त्यामुळे शहर युवक पदाधिकारी यांचा गैरसमज झाला असावा.त्यांनी त्यांची भूमिका मांडली,त्यात काही गैर नाहीच.लोकशाहीत त्यांचा अधिकारच आहे,कारण ते खरे निष्ठावंत आहेत.असेही बगले यांनी मान्य केले.

●  *युवक स्टाईला ताईंचा दुजोरा.* 

————–

प्रत्यक्षात सोलापूर शहर युवक काँग्रेस कार्यक्षम आहे.आपल्या नेतृत्वावर अन्याय झाला तेंव्हा राज्याचे प्रभारी व केंद्रीय नेते मल्लिकार्जून खरगे यांची प्रतिमा जाळून आपली ‘ स्टाईल ‘ दाखवून दिली होती.आत्ता माझ्याबद्दल गैरसमज झाल्याने आपल्या स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.ते योग्य असल्याचा दुजोरा प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कु.प्रणितीताई शिंदे यांनीही दिला आहे.त्याबद्दल मी काही तरी बोलणे गैर ठरेल.

 त्यामुळे शहराच्या वादात न पडता माझा मुद्दा फक्त दक्षिण सोलापूर मतदार संघापुरता मर्यादित आहे.ही माझी ठाम भूमिका आहे.परंतु शहर आणि ग्रामीणचा वाद किंवा विभागणी होवू नये हीच अपेक्षा आहे.कारण मी सुद्धा शहरातील मतदार – नागरिक आहे.आपल्या मतदार संघाबद्दल आणि पक्षाविषयी ईतराप्रमाणेच मलाही अभिमान आहेच,असेही बगले म्हणाले.

●  *आत्मक्लेष व अन्नत्याग आंदोलन करणार.* 

————–

 एक निगर्वी,संयमी,व्यापक समन्वयाचे धोरण ठेवणारे,सर्वांना न्याय देणारे एक सर्वमान्य  नेते म्हणून सुशीलकुमार शिंदे हे देशात ओळखले जातात.राजकीय विरोधक सुध्दा यांना सोलापूरचे राजकीय ” बाप ” म्हणून कबूल करतात.मागील दोन महिन्यापूर्वी काँग्रेस भवनासमोरील फलकावर शाई आणि दगड टाकून कुणीतरी राग व्यक्त केला.याची खंत वाटली.आज पर्यंत त्या निंदनीय घटनेचा तपासही लागला नाही.काँग्रेस आमदारांच्या मतदार संघात देशाच्या नेत्यांचा अपमान झाला.त्याचा तपास होण्यासाठी युवक काँग्रेसने आत्ता आपली स्टाईल वापरून आंदोलन केले पाहिजे.अन्यथा त्या काळ्या घटनेचा तपास होऊन नाराज कार्यकर्ते तसे का वागले ? हे जाहीर होण्यासाठी आपण स्वतः काँग्रेस भवनासमोर एक दिवस ” आत्मक्लेष आणि अन्नत्याग आंदोलन ” करणार असेही डाॅ.बसवराज बगले शेवटी म्हणाले.

————–

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : भरसभेत महापौरांच्या दिशेने बाटली भिरकावली ; भाजपचा ज्येष्ठ नगरसेवकाला पोलिसांनी बाहेर काढले

Next Post

सोलापूर : संविधानामुळेच मी अध्यक्षपदावर, संविधानाचे उपकार मी कधीच विसरणार नाही

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : संविधानामुळेच मी अध्यक्षपदावर, संविधानाचे उपकार मी कधीच विसरणार नाही

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2007156
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group