Tuesday, September 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या सिव्हीलमधील 114 रोजंदारी कर्मचारी वाऱ्यावरच ; 10 वर्षांपासून कायम होण्याच्या प्रतीक्षेत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 February 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील ७५ हजार रिक्त पदे भरण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या ७५ हजार पदांमध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या पदांचा समावेश आहे.

त्यानुसार जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निवड समितीची स्थापना करुन निवड समिती मार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिनस्थ संस्थांमधील वर्ग ४ मधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करावी. असे निर्देश देण्यात आले आहे. 

परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ.वैश्यंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी रोजंदारी तत्वावर ११४ रोजंदारी कर्मचारी मागील १० वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच या ठिकाणी वर्ग ४ ची एकूण १५० च्या वर मंजूर असलेली पदे मागील १० ते १२ वर्षांपासून रिक्त आहेत. 

सदर कर्मचाऱ्यांनी रिक्त पदांवर सामील करून घेणे कामी २०१८ मध्ये न्यायालयीन खटला पण दाखल केलेला असून न्यायाधीश यांनी वारंवार सरकारी वकील व स्थानिक प्रशासन यांना “प्रथमदर्शी न्यायाची बाजू कामगारांकडून आहे. त्यामळे सदर न्यायालयीन प्रकरण न्यायालयाच्या मध्यस्थीने तडजोड करून संपुष्टात आणावा. अन्यथा तसे झाले नाही तर या कामगारांना पहिल्या पासून संपूर्ण पगार द्यावा लागेल.या मध्ये शासनाचे नुकसान होईल.” अशा प्रकारच्या सुचना दिलेल्या असून न्यायालयीन प्रकरण हे शेवटच्या टप्प्यात आले आहे.

या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन या विषयी निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, हा विषय माझ्या कार्यकक्षेत येत नाही. राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सदर भरती होणार म्हणजे होणारच. जर तुम्ही न्यायालयात गेला असाल तर न्यायालयातून तुम्ही लवकरात लवकर निकाल मागावा. किंवा या संदर्भात न्यायालयातून स्थगिती घ्यावी. तसेच हा विषय मी माझ्या स्तरावरून शासनास कळवतो. अशा प्रकारे जिल्हाधिकारी यांनी प्रतीसाद दिला. या वेळी मोठ्या प्रमाणात रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात महापालिकेने सुरू केले अद्ययावत प्रसूतीगृह ; आयुक्तांनी अशा प्रकारे केले उद्घाटन

Next Post

मोठी ब्रेकींग ! तरुण-तरुणीची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मोठी ब्रेकींग ! तरुण-तरुणीची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999335
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group