Tuesday, September 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या ‘इलेक्ट्रो’ प्रदर्शनाचे यंदाचे हे आहे आकर्षण ; प्रदर्शन २४ ते ३० जानेवारी दरम्यान ; स्थळ बदलले, ही आहे जागा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 January 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

३५० स्टॉल्स्पैकी काही स्टॉल्स् हे विशेषरित्या निर्मित वातानुकुलीत मंडपात असणार आहे. सोलापूरात अशाप्रकारचे एसी टेन्ट प्रदर्शनात इलेक्ट्रोमध्ये दुसऱ्यांदा सादर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर – सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम, फिटनेस इक्विपमेंटस्चे भव्य  “इलेक्ट्रो २०२३” चे प्रदर्शन २४ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनु जवळील निर्मित आठ एकरच्या एक्झिबिशन ग्राऊंडवर आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष  ईश्वर मालू यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा इलक्ट्रो प्रदर्शनाचे मेटझ हे मुख्य प्रायोजक असून केल्व्हीनेटर, सिस्का एलईडी, बीपीएल हे सह प्रायोजक आहेत. बजाज फायनान्स हे फायनान्स असोसिएट आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार  २४ जानेवारी रोजी सायं. ५.००  एस. विजय असि जनरल मॅनेजर, मेटझ इंडिया प्रा. लि. यांच्या हस्ते व  मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे इलेक्ट्रो चेअरमन शिवप्रकाश चव्हाण यांनी सांगितले.

  ७ दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो २०२३ या प्रदर्शनाचे हे २३ वे वर्ष असून सोलापूर व सोलापूरच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पहात असतात. दररोज दु. ४ ते रा. ९.३० व रविवारी स. ११ ते रा. ९.३० पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलसीडी, एलईडी, कलर टिव्ही, फ्रिज, साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टिव्ही मायक्रोव्हेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, एअर कंडीशनर, सोलर सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आय पॅड, टेलीफोन, मिक्सर, फुड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कुलर, वॉटर प्युरीफायर, स्टॅबीलायझर, चिमणी हुड, कॉम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंटस् इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात. तसेच बजाज फायनान्स व इतर फायनान्स च्या माध्यमातून शुन्य टक्के व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते.

 सेडा तर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो २०२० ला स्टॉल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. कोव्हीडमुळे दोन वर्षे हे प्रदर्शनाचे आयोजन भव्य प्रमाणावर केले गेले नसल्यामुळे यावर्षी आयोजक, सहभागी व ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सुमारे ३५० स्टॉल्स् असणार असून सुमारे एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील. प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे सुमारे ३०% स्टॉल्स् हे विशेषरित्या निर्मित वातानुकुलीत दालनात असणार आहे.

या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय. तसेच शुध्द पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे. भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे.

सर्व स्टॉल मध्ये जवळपास ४०० विविध पदवीधर विद्यार्थ्यांना कंपनीकडून ट्रेनिंग देवून ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या संपूर्ण संयोजनासाठी सेडाद्वारे विविध समित्या कार्यरत आहे. यंदाचे प्रदर्शन हे वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण आणि सुविधा असणार आहे. स्टॉलधारक आणि प्रेक्षकांसाठी विविध सोई उपलब्ध करण्यात येणार असुन यामध्ये खवय्या साठी फुड कोर्ट इ. सोयी असणार आहेत. धुळमुक्त प्रदर्शनासाठी संपूर्ण मैदान वर मॅटींग ची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी दिव्यांग व्यक्तिंना देखील प्रदर्शन अनुभवता येणार असुन त्यांच्यासाठी व्हील चेअरची विशेष सोय करण्यात आली आहे. प्रेक्षक आणि स्टॉल धारक यांच्या सुरक्षिततेसाठी फायर ब्रिगेड तसेच सिक्युरिटी गार्डस ही नेमण्यात आले आहेत. सेडा तर्फे प्रदर्शन दरम्यान दररोज रक्तदान उपक्रम घेतला जाणार आहे. संपूर्ण प्रदर्शन जास्तीत जास्त कसे डिजीटल होईल यावर संपूर्ण कटाक्ष आहे. प्रर्दशनासाठी प्रशस्त पार्किंगची सोय व माहितीसाठी वेगळे काऊंटर ची व्यवस्था करण्यात आली आहे.

   सेडातर्फे अनेक सामाजिक उपक्रम ही राबविण्यात येत असून त्यामध्ये सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक व आर्थिक मदतही करण्यात येते. कर्मचारी प्रशिक्षणासह व्यवसाय वृध्दीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येतात. या प्रदर्शनातही ४ स्टॉल्स् सामाजिक संस्थांना उपलब्ध करुन दिले असून इच्छुक सामाजिक संस्थांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 या पत्रकार परीषदेस सेडाचे उपाध्यक्ष डॉ. सूरजरतन धुत, सचिव आनंद येमुल, सह सचिव सुर्यकांत कुलकर्णी, खजिनदार भूषण भूतडा व संचालक सर्वश्री सुयोग कालाणी गिरीष मुंदडा, विजय टेके, हरीष कुकरेजा, संदेश कोठारी व सुनिल भांजे तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष केतन शाह, सतिश मालू, आनंदराज दोशी, दिलीप राऊत, दिपक मुनोत, समीर गांधी, विपीन कुलकर्णी, जितेंद्र राठी, कौशिक शाह, खुशाल देढीया संदीप जव्हेरी आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची होणार चौकशी ; शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली ही माहिती ; स्वामींच्या उपक्रमाचे कौतुक

Next Post

एकनिष्ठ अमर पाटलांना मोठी संधी ; शिवसेनेच्या थेट जिल्हाप्रमुख पदावर वर्णी ; पद मिळताच केले हे वक्तव्य

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

एकनिष्ठ अमर पाटलांना मोठी संधी ; शिवसेनेच्या थेट जिल्हाप्रमुख पदावर वर्णी ; पद मिळताच केले हे वक्तव्य

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000705
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group