Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात आडम मास्तरांचा एल्गार ; संसदेवर 5 एप्रिलला यासाठी काढणार लाखोंचा मोर्चा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 March 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर –  माकप, सिटू, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, DYFI, SFI, किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 9 मार्च दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तू व घरगुती गॅसदरवाढ आणि जनता व देशविरोधी अर्थसंकल्प विरोधात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर व सिटूचे राज्य महासचिव एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात  आले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी काळे वस्त्र परिधान करून काळ्या फिती लावून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


मोदी अमित शहा मुर्दाबाद, महिलांवरील अत्याचाराचा धिक्कार असो, लवजिहाद धर्मांतर गोवंश हत्येच्या नावाखाली निष्पापांचा बळी घेणे बंद करा, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्या, वाढीव वीजदर रद्द करा, देश विरोधी अर्थसंकल्प हाणून पाडा, बेरोजगार भत्ता अदा करा, कामगार कायद्याची अंमलबजावणी करा अशा अनेक न्याय हक्काच्या  मागण्या घेऊन गगनभेदी आवाजात घोषणा देत काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. 


आडम मास्तर म्हणाले, आजची महागाई आकाशाला भिडलेली आहे,घरगुती इंधन आणि वाणिज्य इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. लोकप्रतिनिधींची कोट्यवधी रुपयांची विजेची थकबाकी असताना त्याची वसुली करण्यास यंत्रणा कमी पडते मात्र सर्वसामान्यांना न परवडणारी वीजदर वाढ करून गोरगरिबांची चेष्टा सरकारकडून होत आहे. महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची  मालिका चालूच आहे, रक्त सांडून मिळवले कामगार कायदे धुळीला मिळवले,धर्मांधतेला प्रोत्साहन दिले जात आहे, जनता आणि देश विरोधी अर्थसंकल्प सादर करून खोटी आश्वासने दिली जात आहेत.

देशाला अधोगतीकडे नेणाऱ्या भ्रष्ट अदानी अंबानीचा महापूर रोखण्यासाठी मोदीसरकारचा पायउतार करा अन्यथा देश भुकेकंगल होईल. याचा मुकाबला करण्यासाठी 5 एप्रिल रोजी दिल्ली येथे संसदेवर आक्रोश मोर्चा धडकणार असून सरकारला सळो की पळो केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही असा निर्धार माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले. 

  


प्रास्ताविक युसुफ मेजर यांनी केले. यावेळी नसीमा शेख, सिध्दप्पा कलशेट्टी, अशोक इंदापुरे, दत्ता चव्हाण, मल्लेशम कारमपुरी आदींनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.  


व्यासपीठावर कमिनीताई आडम,नलिनीताई कलबुर्गी, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, अँड.अनिल वासम,म.हनिफ सायखेड, मुरलीधर सुंचू आदींची उपस्थिती होती.


यावेळी विल्यम ससाणे, शकुंतला पाणिभाते, लिंगव्वा सोलापूरे, विक्रम कलबुर्गी, वसीम मुल्ला, गजेंद्र दंडी, अशोक बल्ला, किशोर मेहता, दाऊद शेख, आसिफ पठाण,इलियास सिद्दीकी, अकिल शेख, बाबूलाल फनिबंद, कादर शेख, सनी शेट्टी, दीपक निकंबे, श्रीकांत कांबळे, अमित मंचले, शाम आडम, शहाबुद्दीन शेख, आरिफ मनियार, गीता वासम, नागेश म्हैत्रे, बालाजी गुंडे, नरेश गुल्लापल्ली, चंटी बिटला, अकबर लालकोट, किशोर गुंडला, मल्लिकार्जुन बेलियार, बालाजी तुम्मा, डेविड शेट्टी, परशुराम बुगले, बालाजी म्हैत्रे, दिनेश बडगू, प्रकाश जगले, इमाम शेख, जैद मुल्ला, नागेश महेशन, नागनाथ जल्ला, सद्दाम बागवान, राजू सीता, सुरेश गुजरे आदींनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपी समाज कल्याण अधिकारी कार्यालयात महिला दिन साजरा

Next Post

ग्रामसेवक पुरस्कार विभागून म्हणजे ‘ऍडजेस्टमेंट’ ; असा चुकीचा पायंडा पडणार नाही ; शेळकंदे आपल्या भूमिकेवर ‘स्टेकअप’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ग्रामसेवक पुरस्कार विभागून म्हणजे 'ऍडजेस्टमेंट' ; असा चुकीचा पायंडा पडणार नाही ; शेळकंदे आपल्या भूमिकेवर 'स्टेकअप'

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979126
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group