Sunday, September 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सिध्देश्वर कारखाना बचावसाठी मुख्यमंत्र्यांना रक्तांनी लिहिले पत्र प्रशासनाविरुध्द शेतकरी, कामगारांनी उचलले पाऊल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 December 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  विमानसेवेचे निमित्त पुढे करून काही दुष्ट मंडळींच्या कपट कारस्थानातून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास दिलेली नोटीस मागे घ्यावी यासाठी गेल्या 32 दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सिध्देश्वर राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार व शेतकरी सभासद अनंतप्पा बुगडे (चपळगाव) यांनी आपल्या रक्तांनी जळजळीत पत्र लिहून कारखान्याविरुध्दच्या सर्व नोटिसा मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कारखाना बचावसाठी कारखान्याच्या कार्यस्थळावर गेल्या 32 दिवसांपासून कामगारांचे तर शेतकर्‍यांचे 31 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. बोरामणी येथे मंजूर असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू करा, कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता होटगी रोड विमानतळाच्या 15 नंबर धावपट्टीवरून विमानसेवा सुरू करा, कारखान्यास दिलेल्या सर्व नोटिसा प्रशासनाने मागे घ्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी कामगार आणि कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी सोलापूर-विजयपूर, सोलापूर-हैदराबाद या महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन केले. 

19 डिसेंबर रोजी कारखान्यापासून होम मैदानापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये कारखान्याचे कामगार, त्यांचे कुटुंबीय, शेतकरी सभासद व त्यांचे कुटुंबीय, कारखान्याचे हितचिंतक आदी सुमारे 25 हजारांपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. या सर्व आंदोलनानंतरही प्रशासनातील एकाही अधिकार्‍याने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला नाही. त्या निषेधार्थ साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार व शेतकरी सभासद अनंतप्पा बुगडे यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून कामगार आणि शेतकरी सभासदांच्या संतप्त भावना मांडल्या आहेत.

सिध्देश्वर कारखान्यावर कामगारांचे 15 हजार आणि 28 हजार सभासदांचे कुटुंबीय तसेच ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक चालक-मालक यांच्याशिवाय प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक लोकांची उपजीविका अवलंबून आहे. कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता विमानसेवेसाठी बोरामणी येथील विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करा. या नव्या विमानतळामुळे सोलापूरचा विकास होईल. जर कारखान्याच्या चिमणीला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर आम्हाला आत्मदहन करण्याची परवानगी द्या, अशी मागणी बिराजदार व बुगडे यांनी रक्ताळलेल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. सदरचे पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सुशीलकुमार शिंदे यांचे सीमा प्रश्नावर भाष्य ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका ; लोकसभा निवडणूक लढविणार का? काय दिले उत्तर पहा

Next Post

धर्मराज काडादी निवडणुकीला उभे राहिल्यास आम्ही उमेदवार देणार ; सोलापूरच्या बुद्धिजीवींचा विमानसेवेसाठी एल्गार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धर्मराज काडादी निवडणुकीला उभे राहिल्यास आम्ही उमेदवार देणार ; सोलापूरच्या बुद्धिजीवींचा विमानसेवेसाठी एल्गार

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001063
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group