Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

साहेबांचा नकार अन् सुधीर खरटमल यांनी थोपटले दंड ; सोलापूरच्या राजकारणात चर्चेला उधाण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 January 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूरच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून लोकसभेच्या खासदारकीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. विद्यमान खासदार जरी भाजपचा असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये या खासदारकीवरून चर्चेला ऊत आले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा निवडणूकीत  झालेल्या दोन वेळच्या पराभवानंतर आपण यंदाची लोकसभा लढवणार नाही असे दोन ते तीन वेळा जाहीरपणे सांगितले आहे आणि एकूणच परिस्थिती पाहता ते मैदानात यावेळी उतरण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांना वाढदिवसाच्या दिवशी दीर्घायुष्यसह भावी खासदारकीच्याही शुभेच्छा दिल्या. या खासदारकीच्या शुभेच्छा वरून काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण आहे. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आरिफ भाईंचे कुंकू सहित मंगळसूत्रही काढले. नरोटे यांचं सगळं राजकारण माहीत असलेल्या आरिफ शेख यांनी मात्र या विषयात सावध प्रतिक्रिया देत जादा बोलणे टाळले.

या विषयात सुधीर खरटमल सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. सोलापूरच्या खासदारकीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्याने त्याचं काँग्रेसनेही टेन्शन घेतले आहे. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला उमेदवार नसल्याने सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात सुधीर खरटमल यांच्याही नावाची चर्चा झाली. परंतु साहेबांच्या विरोधात आपण कधीही उभारणार नाही, आपण तसा विचारही करू शकत नाही असे खरटमल यांनी सांगितले होते. मात्र आता स्वतः शिंदे यांनी लोकसभा लढवणार नाही अशी घोषणा केल्याने खरटमल यांनी दंड थोपटले आहेत.

 त्यानुसार खरटमल हे तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते,  सुधीर खरटमल यांच्या नावावर खुद्द शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलयं. त्यांना लोकसभेची तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांनी लोकसभेची फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : मोहोळ तालुक्यात उजनीचा कॅनॉल फुटला ; शेतीचे प्रचंड निकसान ; पहा हे व्हिडीओ

Next Post

बाबा मिस्त्री यांचे ‘हद्दवाढ’च्या प्रॉपर्टी कार्डबाबत मोठे विधान ; सोलगी नगर वासियांच्या सत्काराने भारावले !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बाबा मिस्त्री यांचे 'हद्दवाढ'च्या प्रॉपर्टी कार्डबाबत मोठे विधान ; सोलगी नगर वासियांच्या सत्काराने भारावले !

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979138
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group