Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

संजय हेमगड्डी, अरुण शर्मा वर मनोज यलगुलवार “भारी” : स्पेशल रिपोर्ट !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर काँग्रेस कमिटी मध्ये कार्यकर्ते कमी अन् पदाधिकारी जास्त असे चित्र आहे, कोणता पदाधिकारी आपल्या पदाला किती न्याय देतोय हे सर्वश्रुत आहे. एकाच घरात दोन पदे आहेत, तीन वर्षांपूर्वी शहर अध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छूक होते, शेवटी खरटमल यांच्या राजीनाम्यानंतर शहर उत्तर व काँग्रेस पासून लांब होत चाललेला लिंगायत समाजाचा विचार करत काँग्रेस श्रेष्ठींनी प्रकाश वाले यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ घातली, मात्र अध्यक्षपदावर डोळा ठेवलेल्या माजी महापौर संजय हेमगड्डी, “स्वीट स्वीट” बोलणारे अरुण शर्मा यांचा चांगलाच हिरमोड झाला, पक्षाने याचा विचार करून शहरात दोन कार्याध्यक्ष पदे नव्याने तयार केली आणि ती पदे लगेच हेमगड्डी व अरुण शर्मा यांना दिली, 

तसे पाहिले तर शहर कार्याध्यक्ष पद ही तसे कामाचे आहे, पदाला न्याय तो नेता कसा देतोय त्यावर त्या पदाचे महत्व वाढते, आजपर्यंत या दोन कार्याध्यक्षांनी कोणतंही स्वतंत्र आंदोलन घेतले नाही, कोणता कार्यक्रम घेतला नाही, केवळ जयंती, पुण्यतिथी, राष्ट्रीय सण आंदोलन व उपोषणाला ते हजेरी लावतात, शहर कार्याध्यक्ष पदाला न्याय कसा द्यायचा हे राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्याकडून शिकलं पाहिजे.

का म्हणून या दोघांनी हे पद घेतलंय असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. शेवटी आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी माजी नगरसेवक मनोज यलगुलवार यांना शहराचे तिसरे कार्याध्यक्ष पद दिले, पद मिळाल्या पासून यलगुलवार सक्रिय झाले आहेत, ते सर्व कार्यक्रमाला तर असतातच परन्तु सध्या एक घास मदतीचा या माध्यमातून ते वंचितांचा आधार झाल्याचं चित्र आहे,

 ख्रिश्चन धर्मगुरूना धान्याचे किट वाटप, भगवान नगर मधील कामगार वर्गातील 500 नागरिकांना जेवण वाटप, राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त मांग गारुडी समाजाला अन्नधान्य किट वाटप, पत्रकार बांधवांना मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप केले, गरजू काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांना मदतीचा हात दिला, यासह मोची गल्ली, लोधी गल्लीतील कंटेंटमेन्ट झोन उठवण्याबाबत पोलीस, महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. यंत्रमाग, विडी, बांधकाम व असंघटित कामगारांना सरकारने मदत देण्यासाठी निवेदन देऊन लक्ष वेधले,

 मनोज यलगुलवार शहर कार्याध्यक्ष पदावर आल्याने खरा न्याय या पदाला मिळाला आहे, यलगुलवार जरी आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा जरी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असली तरी इतर कार्याध्यक्ष ते सुद्धा करताना दिसत नाहीत , दोन वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही हेमगड्डी व शर्मा यांनी किती कार्यक्रम घेतले, कोणकोणते उपक्रम राबविले, कोरोना काळात काय काय केले, सध्या तर किती कठीण काळ आहे, असे असताना यांचा वाटा किती आहे हा ‘जाब’ पक्षाने व वरिष्ठांनी विचारणे गरजेचे बनले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

भाजपचा बार ‘फुसका’ ; प्रशांतरावांना पडले विधान परिषदेचे, इतर आमदार म्हणतात आम्हाला काय झेडपीचे?

Next Post

सोलापुरात २५ हजार कामगारांनी काळे वस्त्र, काळ्या फिती, काळे झेंडे दाखवून केला केंद्र सरकारचा निषेध!

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात २५ हजार कामगारांनी काळे वस्त्र, काळ्या फिती, काळे झेंडे दाखवून केला केंद्र सरकारचा निषेध!

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002448
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group