सोलापूर ! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी हे सोलापूर दौऱ्यावर होते, ते काँग्रेस भवनात असताना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा वडार समाजाचे नेते शंकर चौगुले हे शनिवारी काँग्रेस भवनात आले, त्यांच्यासोबत वडार समाजातील बरेच मान्यवर होते, वडार समाजातील काँग्रेसचे ओबीसी प्रदेश सचिव सुशील बंदपट्टे यांनी शंकर चौगुले व त्यांच्या सोबत आलेल्या शिष्टमंडळाची भेट भानुदास माळी यांच्याशी घालून दिली, सुरुवातीला शिवसेनेचे नेते काँग्रेस भवनात का आले ही चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रंगली, यावेळी चौगुले यांनी वडार समाज हा शेजारच्या राज्यांमध्ये अनुसूचित जाती मध्ये आहे मात्र महाराष्ट्रात हा समाज ओबीसी मध्ये गणला जातो देश एकच असताना प्रवर्ग वेगवेगळे का असा प्रश्न चौगुले यांनी उपस्थित केला ज्या पद्धतीने कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठून त्यांना अनुसूचित जाती मध्ये समाविष्ट करावे असा ठराव विधानसभेत करण्यात आला, तशीच मागणी आमची आहे असे माळी यांच्यासमोर सांगितले. तेव्हा माळी यांनी या प्रकरणी सविस्तर निवेदन मला द्या मी प्रदेशाध्यक्ष पटवले यांच्याशी बोलून तुमची बैठक लावतो असे आश्वासन दिले.
ओबीसी प्रदेश सचिव सुशील बंदपट्टे यांनी सांगितले, वडार समाजाला अनुसूचित जाती मध्ये समाविष्ट करण्याची मागणी अनेक वर्षापासूनची आहे त्यासाठी ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत बैठक लावावी आणि राज्यातील वडार समाजाला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करावे.



















