सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार 12 जुलै रोजी नियोजन भवनात ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केले होते, सभाही ऑफलाईन होणार असल्याने सदस्यांमधून उत्साहाचे वातावरण होते परंतु शुक्रवारी अचानक कोरोनाचा संसर्ग पाहता जिल्हा परिषदेची सभा ही ऑनलाइन पद्धतीने घ्यावी असे पत्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला दिले, सभाही ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने सदस्यांमधून तीव्र संतापाची लाट पसरली, सभेमध्ये विविध विषय मांडता येतात विविध प्रश्नांना वाचा फुटते असे असताना सभा ऑनलाइन पद्धतीने झाल्यास कोणतेही प्रश्न मांडता येत नाहीत त्यामुळे सांगोल्याचे सदस्य एडवोकेट सचिन देशमुख यांनी याप्रकरणी प्रशासनावर संताप व्यक्त केलाय.
सभेला परवानगी न देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेचे अधिकारी सभा ऑफलाइन पद्धतीने होऊ नये यासाठी एकजुटीने प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे
जिल्हा नियोजन भवनांत सर्व मिटिंग चालतात , मुंबई मधे विधान सभेचे अधिवेशन चालते पण आपली मिटिंग चालू शकत नाही याचा अर्थ काय ? आपल्या सभागृहांत मिटिंग घेण्यास अडचण काय ? पण हे जाणीवपूर्वक चालू आहे असे सर्व सदस्य यांचे मत पुढे आले, सोमवारी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य एकत्र येऊन ऑनलाईन मीटिंग बंद पाडून ही मिटिंग खुल्या जागेत घेण्याचे नियोजन सदस्यांनी केले आहे.




















