Sunday, July 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

रे नगर प्रकल्पाची लगबग वाढली ; येत्या 8 व 9 जुलै रोजी केंद्रीय अधिकारी सोलापूर दौऱ्यावर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 July 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कुंभारीच्या माळरानावर साकारत असलेल्या रे नगर गृहप्रकल्पातील 30 हजार पैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांच्या हस्तांतरणासाठी हालचालींना वेग आला आहे. याचा पाठपुरावा थेट दिल्लीतील पंतप्रधान आवास योजना कार्यालयातून करण्यात येत आहे. 

दरम्यान, येत्या 8 व 9 जुलै रोजी केंद्रातील वरिष्ठ अधिकारी या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी सोलापूर दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज बुधवारी पुण्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला.

ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या पाठपुराव्यातून कुंभारी परिसरात सुमारे 30 हजार घरांचा प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे घरकूल उभारणीबरोबरच या प्रकल्पात मुलभूत व पायाभूत सुविधा युध्दपातळीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांच्या चाव्या येत्या नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत. या सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी रे नगर फेडरेशन सज्ज झाले असून लाभार्थ्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. याचा पाठपुरावा थेट पंतप्रधान आवास योजना कार्यालयातून होत आहे. यासाठी 8 व 9 जुलै रोजी पंतप्रधान आवास योजना कार्यालयातून केंद्रीय स्तरावरचे अधिकारी येत आहेत. 

हा दौरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी शंभरकर हे पुण्यात असतानाही त्यांनी तातडीची बैठक घेऊन व्हीसीद्वारा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, रे नगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख मेजर, विकासक अंकुर पंधे, अभियंता मेहुल मुळे, लक्ष्मण माळी, वीरेंद्र पद्मा, अ‍ॅड. अनिल वासम उपस्थित होते.

रे नगर येथे वीज, 24 तास पाणी, मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते, पथदिवे, शाळा, अंगणवाडी, वनीकरण यासारख्या महत्वाच्या विषयावर सर्व संबंधित खात्याचे अधिकार्‍यांशी स्वतः जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संपर्क साधून आढावा घेतला.  तसेच काम युद्धपातळीवर पूर्ण होण्यासाठी येत असलेल्या समस्या व त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना, लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अत्यल्प व्याज दरात कर्जाची उपलब्धता करून देण्यासंदर्भात सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापकांशी ही जिल्हाधिकार्‍यांनी चर्चा केली.

SendShareTweetSend
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे बोलावलेल्या बैठकीला सोलापुरातून इतके पदाधिकारी राहिले हजर

Next Post

चार तास ताटकळलेले विडी कामगार संतापले अन् केला ठिय्या ; सहाय्यक कामगार आयुक्तानी मागितली विडी कामगारांची माफी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

चार तास ताटकळलेले विडी कामगार संतापले अन् केला ठिय्या ; सहाय्यक कामगार आयुक्तानी मागितली विडी कामगारांची माफी

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986540
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group