Thursday, November 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोठी बातमी : साठे-पवार गटाला न्यायालयाचा ‘दणका’ ; उत्तर सभापती अविश्वास ठरावावर कोणतीही कारवाई करू नये ; उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 October 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला.  त्यानंतर त्यांनी मंजूर झालेल्या अविश्वास ठरावाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते.  याप्रकरणी गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली.

उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या पारित करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर कोणतीही कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने आज दिले आहेत. त्यामुळे नियोजित सभापती निवड करता येणार नाही. पुढील तारीख 17 नोव्हेंबर 2021 ही पडली आहे.न्यायमूर्ती एस जे काथावाला व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांचे द्विसदस्यीय पीठ यांनी अंतरिम आदेश दिले आहेत. याचिकाकर्ते यांच्यावतीने वकील अभिजीत कुलकर्णी शासनाच्या वतीने श्रीमती भिडे व शीलवंत यांच्या वतीने वकील राजशेखर आळंगे यांनी काम पाहिले.

उपसभापती जितेंद्र शिलवंत, संध्याराणी पवार, हरी शिंदे यांनी अविश्वास ठराव साठी अर्ज केला, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभा काढली. मात्र निवड घेऊ नये म्हणून सभापती भडकुंबे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानंतर पीठासीन अधिकारी प्रांत अधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यालयाकडून नोटीस देण्यासाठी पळापळ सुरू झाली. नंतर शुक्रवारी 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेत  तीन विरुद्ध एक मताने ठराव मंजूर झाला होता. दरम्यान उच्च न्यायालयाचा निकाल हा उत्तर तालुक्याचे नेते काका साठे, भाजप नेते इंद्रजित पवार, जितेंद्र साठे यांना मोठा दणका समजला जातो.

दरम्यान उच्च न्यायालयात कोणते मुद्दे मांडले ते पहा

[  ] सदरचा अविश्वास ठराव हा ‘बहुमताच्या दडपशाहीचे’ उदाहरण आहे. सन 2017 पासून सभापती म्हणून कामकाज करीत असताना संबंधित सदस्यांची रजनी भडकुंभ यांच्या कार्यप्रणाली बद्दल कोणतीही तक्रार नव्हती. त्यामुळे, लोकहिताची कामे करत असताना; सदस्यांच्या किंवा त्यांच्या नेत्याच्या व्यक्तिगत हितास बाधा उत्पन्न होते, म्हणून, राजकीय कारणांसाठी बहुमताची दडपशाही करणे; हे लोकशाहीस अभिप्रेत नाही. त्यामुळे, सभेत बहुमताची दडपशाही झाल्याने; ठराव अवैध ठरत आहे.

[  ] अविश्वास ठराव ची सभा व त्यात पारित झालेला ठराव बेकायदेशीर व अवैध असल्याचे जाहीर करून मिळण्यासाठी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच रजनी भडकुबे यांना त्यांचे सभापतिपद पुनर्स्थापित करून देण्याबाबत निर्देश उच्च न्यायालय द्यावेत; अशी देखील मागणी रजनी भडकुंभ यांनी याचिकेत केली आहे.

[  ] जिल्हा परिषद पंचायत समिती कायदा कलम 72 पोट कलम 3 अन्वये सोलापूर जिल्हाधिकारी यांनी अविश्वास ठरावाची सभा बोलण्या बाबत अधिकार कायद्याने दिले आहेत परंतु, अविश्वास ठरावाची सभा जिल्हाधिकारी यांनी न बोलता प्रांत अधिकारी यांनी बोलवली आहे.  सदर कलम 72 पोटकलम 3 अनुसार जिल्हाधिकारी यांना स्वतःचे अधिकार हस्तांतरित करण्याचा हक्क कायद्याने दिलेला नाही. कायद्याची हीच मर्यादा सरकारी व्यवस्थेने लक्षात घेतली नाही. 

[  ] जिल्हाधिकारी यांचे अधिकार हस्तांतर होण्याबाबतकलम 72 पोट कलम 4 मर्यादित स्वरूपाची तरतूद  मध्ये आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी हे स्वतः किंवा त्यांनी अधिकृत केलेली व्यक्ती अविश्वास ठरावाच्या सभेची पीठासन अधिकारी म्हणून कामकाज करतील; एवढीच मुभा कायद्याने दिली आहे. 

[  ] सभा बोलावण्याचे अधिकार हे पीठासन अधिकारी म्हणून काम करण्याच्या अधिकारापासून अलहिदा आहेत. त्यामुळे अविश्वास ठराव ची सभा उपविभागीय अधिकारी यांनी बोलणे हा पदाचा गैरवापर आहे.

[  ] सदर सभेची नोटीस ही अविश्वास ठरावाचा पाया आहे. त्याबाबत रजनी भडकुबे यांनी दि. 22 ऑक्टोबर 2019 रोजी हरकत घेतली होती. परंतु, रजनी भडकुंबे यांच्या हरकतीची दखल घेण्यात आली नाही व बेकायदेशीरपणे सभा घेण्यात आली.

[  ] अविश्वास ठरावाची मागणी केल्यानंतर सात दिवसाच्या आत अविश्वास ठरावाची सभा जिल्हाधिकारी यांनी बोलवणे अपेक्षित आहे. परंतु सात दिवसानंतर अविश्वास ठरावाची सभा बोलवण्याचे जिल्हाधिकारी यांचे अधिकार नष्ट होतात. प्रस्तुत प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी विश्‍वास ठरावाची मागणी होऊन सात पेक्षा जास्त दिवस झाले तरी सभा बोलण्या बाबत कोणतीही नोटीस बजावलेली नाही. तसेच उपविभागीय अधिकारी यांना सभा बोलण्याचा कोणताही अधिकार कायद्याने दिलेला नाही.

[  ] अविश्‍वास ठरावाची मागणी करताना जे मुद्दे नमूद केलेले आहेत ते अत्यंत मोघम स्वरूपाचे आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : काँग्रेस भवनाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट ; पहा काय कारण

Next Post

म्हेत्रे साहेब, राजकारण बाजूला ठेवू…., असे का म्हणाले भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

म्हेत्रे साहेब, राजकारण बाजूला ठेवू...., असे का म्हणाले भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2006818
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group