Wednesday, July 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माझी वसुंधरा अभियानाचा श्रीगणेशा ; अडीच लाख तुळशीची रोपे लावा ; जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह यांनी का दिला हा मंत्र पहा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापूरः नॅशनल वाॅटर अॅवाॅर्ड विजेत्या महूद बुद्रूक (ता. सांगोला, जि. सोलापूर) गावाने आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपणाने माझी वसुंधरा अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला. तसेच डाॅ. सिंह यांनी महूद बुद्रूक गावाच्या समग्र ग्रामविकासासाठी कासाळगंगा फाऊंडेशनचे ब्रँड अॅम्बेसेडर अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे हे असतील, अशी घोषणा केली.



माॅडेल व्हिलेजच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी महूद ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी लुबाळ यांच्या अध्यक्षतेखाली रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीवेळी माझी वसुंधरा अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.  स्वामी यांच्या उपस्थितीत त्यासंबंधाने पहिली बैठक झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीसाठी डाॅ. सिंह, चिन्मय, ऋतुजा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकांदे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मीता पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कार्यकारी अभियंता पंडित भोसले , यशदा चे निवृत्त वरिष्ठ अधिकारी सुमंत पांडे, अग्रणी नदी पुनर्जीवनाचे समन्वयक नरेंद्र चुग, नमामि गोदा फाऊंडेशनचे प्रमुख राजेश पंडित, आदिनाथ ढाकणे, उपसरपंच महादेव येळे आदी उपस्थित होते. या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी पुढील लोकसंख्येचा विचार करता, गावाच्या परिसरात अडीच लाख तुळशीच्या रोपांची लागवड करावी, असे मार्गदर्शन डाॅ. सिंह यांनी केले. 




लोकसहभाग कौतुकास्पद ः डाॅ. सिंह

वसुंधरा, पृथ्वीच्या रक्षणासाठी पर्यावरणपूरक जीवनप्रणालीचा अवलंब करणे किती आवश्यक आहे, यावर भर देत डाॅ. सिंह यांनी गावाच्या लोकसहभागाचे आणि एकजुटीचे कौतुक केले. समग्र ग्रामविकासासाठी गाव एक आल्याचा आनंदभाव त्यांनी मांडला. 


बंधाऱ्याचे काम लागणार मार्गी ः धोत्रे

माझी वसुंधरा, आदर्श गाव योजना आणि शासकीय योजनांची माहिती देत श्री. धोत्रे यांनी जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरच्या नळकनेक्शनसाठी वाॅटर मीटर लावण्यासाठी सहकार्य केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सहा महिन्यात शोषखड्डे उपक्रम सहा महिन्यात गावाने राबवण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. गावच्या शिवारातील बंधाऱ्याचे काम मार्गी लागेल, अशी माहिती उपस्थितांना दिली. 


वसुंधरा समृद्धीसाठी एकजूट महत्वाची ः शेळकांदे

वसुंधरेच्या समृद्धीसाठी एकजूट महत्वाची आहे, याकडे लक्ष वेधत श्री. शेळकांदे म्हणाले, की ग्रामपंचायतीच्या गायरानावरील फळबाग लागवड करुन उत्पन्न वाढीच्या जोडीला निसर्गाच्या सान्निध्यात आपले जीवन सुककर कऱणे शक्य आहे. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे.


निधीची उपलब्धता ः सौ. पाटील

सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीच्या उपलब्धतेची माहिती सौ. पाटील यांनी दिली. माझी वसुंधराची शंभर टक्के अंमलबजावणी ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले. 

……………………………………………

 


घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावण्यासोबत माझी वसुंधरा अभियान यशस्वी होण्यासाठी महूदकरांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. याशिवाय आरोग्य रक्षण, करिअर मार्गदर्शन याविषयी महूद ग्रामस्थांना मदत केली जाईल.

-श्री. दिलीप स्वामी (मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद)

…………….


आम्ही महूदकर ः चिन्मय आणि ऋतुजा

सामाजिक सामिलकीच्या भावने महूदच्या समग्र ग्रामविकासामध्ये ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून मिळालेल्या संधीचा अभिमान वाटतो. आता आम्ही महूदकर झालो आहोत. यापुढील काळात वसुंधरासह सगळ्या कामांमध्ये आम्ही महूदकरांसोबत राहू, अशी ग्वाही अभिनेते चिन्मय उदगीकर आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे यांनी दिली. तसेच कासाळगंगा ओढा पुनर्जीवनातून शेतकऱ्यांच्या जीवनात मिळालेल्या स्थैर्याची, ओढा पुनर्जीवन कामाची पाहणी दोघांनी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

…..

SendShareTweetSend
Previous Post

भाजप खासदारांचे “शिष्य” काँग्रेसच्या संपर्कात ; गाठीभेटी वाढल्या, लवकरच प्रवेश

Next Post

सोलापूरात ‘जाती’चे नाही तर ‘नीती’चे राजकारण करणार ; या पक्षाने केला महापालिकेत ‘महापौर’ होण्याचा अजब दावा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात 'जाती'चे नाही तर 'नीती'चे राजकारण करणार ; या पक्षाने केला महापालिकेत 'महापौर' होण्याचा अजब दावा

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1993426
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group